(फोटो सौजन्य: Instagram)
कुठेही बाहेर जायचे असले किंवा काही सामान खरेदी करायचं असलं की आपण नेहमीच आपल्या हातात एक पिशवी किंवा बॅग घेऊन घराबाहेर पडतो. लोक बऱ्याचदा कापडी पिशव्या घेऊन जातात तर कोणी फुकटात मिळालेल्या काही ब्रँड्सच्या पिशव्या घेऊन फिरतात. अशा पिशव्यांवर त्या त्या ब्रँडची नावे लिहिलेली असतात अशातच या पिशव्यांसंबंधितच एक अनोखा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. यात दोन परदेशी महिला अशीच एक भारतीय ब्रँडची पिशवी मिरवताना दिसून आल्या. मात्र त्यावर जे नाव लिहिले होते ते वाचून सर्वांनाच आपले हसू अनावर झाले. लोकांनी या व्हिडिओची बरीच मजा लुटली आणि आम्ही तुम्हाला सांगतो की, ही पिशवी विमल म्हणजेच एका पान मसाल्याच्या ब्रँडची होती.
पुण्यातील Influencer चा संतापजनक प्रकार; थेट लघवी लावली डोळ्यांना, नेटकऱ्यांचा चढला पारा
काय दिसले व्हिडिओत?
इंस्टाग्रामवर रील बनवणाऱ्या या दोन परदेशी महिलांची नावे रोसाल्बा पेरेझ आणि जॅकलिन मोरालेस आहेत, ज्यांनी विमल बॅग्ज स्टाईलमध्ये भारताच्या रस्त्यावर मिरवल्या. यामुळे सोशल मीडियावर आता हास्याचा धुमाकूळ उडाला असून “नो गुच्ची, नो प्रादा, नो एलव्ही, ओन्ली विमल” असे कॅप्शन देत या व्हिडिओला शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेला हे देसी-विदेशी मिश्रण लोकांना हसवत आहे आणि सर्वांना आश्चर्यचकित करत आहे. पान मसाल्यासाठी ओळखला जाणारा विमल आता त्याच्या बॅग्जमुळे चर्चेत आहे. भारतात, या बॅग्ज साधारणपणे किराणा दुकानात ४० रुपयांना मिळतात, परंतु आता त्या परदेशी पर्यटकांसाठी फॅशनचा एक भाग बनल्या आहेत. रोसाल्बा आणि जॅकलिनने अभिमानाने रंगीबेरंगी कपड्यांमध्ये भारतातील रस्त्यांवर या बॅग्ज फिरवल्या. व्हिडिओमध्ये त्या हसत हसत विमल बॅग्ज मिरवताना दिसून आल्या.
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @namasterosy आणि @jamocu नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत करोडो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मला हे आवडले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बेस्ट फॅशन” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “बोला जुबान केसरी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.