खूप गंभीर चर्चा सुरु आहे! नदीकिनारी भरली कासवांची राउंड टेबल कॉन्फरन्स, चिटुकले पिटुकले सर्व आले एकत्र; मजेदार Video Viral
सोशल मीडियावर नुकताच एक अनोखा आणि मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यातील दृश्ये नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर इथे बरेच आश्चर्यकारक व्हिडिओज व्हायरल होताना तुम्ही पाहिले असतील. असाच एक नवा व्हिडिओ नइथे शेअर झाला आहे ज्यात कासवांच्या एक गट नदीकिनारी बसून एका गंभीर विषयावर चर्चा करताना दिसून आला आहे. तुम्ही आजवर अनेक मिटींग्स पाहिल्या असतील पण कासवांची मिटिंग तुम्ही कधी पाहिली आहे का? व्हिडिओत दिसून येणारे हे दृश्य फारच मजेदार असून युजर्स आता यावर आपल्या निरनिराळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. चला व्हिडिओत नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात कासवांचा एक गट नदीकिनारी एक वर्तुळ करून बसल्याचे दिसून येत आहे. त्यांचा आकार पाहता ते सर्व कासवांची पिल्ले असल्याचे भासून येत आहे. ही चिटुकली पिटुकली सर्व कासवं एकत्र येतात आणि ठरल्याप्रमाणे आपल्या गहन मिटिंगसाठी नदीकिनारी जमतात. मुख्य म्हणजे यावेळी ती सर्वच कासवं शांत मांडी घालून अगदी शिस्तीत बसलेली असतात ज्यामुळे हे दृश्य आणखीनच मजेदार बनते. व्यक्तीने जेव्हा हे दुर्लभ दृश्य नदीकिनारी पाहिले तेव्हा त्याने याचा व्हिडिओ आपल्या कॅमेरात कैद केला आणि लगोलग हे दृश्य सोशल मीडियावर शेअर केले. दरम्यान कासवांच्या मिटिंगचा हा व्हिडिओ आता इंटरनेटवर इतका व्हायरल झाला आहे की लोकांनी अक्षरशः हा व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली आहे. ही मिटिंग नक्की कशाबाबत रंगली हे जरी समजले नसले तरी लोकांनी याबाबत अनेक मजेदार अंदाज लावण्यास सुरुवात केली आहे.
कासवांच्या मिटिंगचा हा व्हिडिओ @mw10.01 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पहिली गोष्ट: आपण इतके मंद का आहोत? ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “उद्या सर्वांची पॅरेंट्स मिटिंग आहे वाटतं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भाईचारा ऑन टॉप”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.