(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडियावर सध्या एक थरारक दृश्य शेअर झाले आहे ज्यातील दृश्ये तुमच्या अंगाचा थरकाप उडवतील. वास्तविक, सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज शेअर होत असतात. इथले बरेच व्हिडिओज आपल्या कल्पनेपलीकडचे ठरतात आणि म्हणूनच कमी वेळेत ते आपले लक्ष वेधतात. असाच लक्षवेधी ठरणारा एक थरारक व्हिडिओ नुकताच इथे शेअर झाला आहे ज्यात एका ॲनाकोंडाने दुसऱ्या ॲनाकोंडाला गिळंकृत केल्याचे भयावह दृश्य दिसून आले आहे. ॲनाकोंडा जंगलातील सर्वात धोकादायक प्राणी आहे त्याच्या विशाल शरीराच्या जोरावर तो जंगलातील अनेक प्राण्यांची शिकार करतो खरी पण त्याची ही शिकार आता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत आहे. बरं स्वतःच्याच प्रजातीतील जीवाला खाल्ल्यानंतर आता पुढे या दृश्यात नक्की काय घडून आलं ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात सुरुवातीलाच एक भलामोठा ॲनाकोंडा संघर्ष करताना दिसून येत आहे. यावेळी त्याचे शरीर भरलेले आणि त्याला कुणाला तरी गिळंकृत केल्याचे भासत आहे. पण काही वेळातच आपल्याला त्याच्या तोंडात आणखीन एका सापाचे डोकं दिसून येते ज्यावरून त्याने याला गिळंकृत केल्याचे समजते. ॲनाकोंडाने त्याची शिकार करून त्याला मारून टाकले आहे असेच या दृश्यातून दिसून येते पण पुढच्याच क्षणी अचानक हा साप ॲनाकोंडाच्या शरीरातून बाहेर येऊ लागतो जे पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरते. बहुदा ॲनाकोंडाला त्याला खाता आले नसावे ज्यामुळे त्याने सापाला लगेच आपल्या शरीरातून बाहेर काढले. ॲनाकोंडा बऱ्याचदा आपल्याला भक्ष्याला गिळून टाकल्यानंतर त्याला तोंडावाटे बाहेर काढतात आणि आताही काही असेच घडल्याचे व्हिडिओत दिसून आले. ज्याने मारले त्यानेच जिवंतही केले असेच काहीसे दृश्य यात दिसले आणि ते सोशल मीडियावर शेअर केले गेले. इंटनेटवर आता हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून ॲनाकोंडा दुसऱ्या ॲनाकोंडालाही खाऊ शकतो ही कल्पना आता सर्वांनाच थक्क करून सोडत आहे.
Female anaconda regurgitating another anaconda pic.twitter.com/E0WqfrEkXR — Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) August 6, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो लहान जीव अजूनही जिवंत आहे का” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ती जन्म देत आहे का? की हा दुसरा अॅनाकोंडा आहे जो तिला पचवता आला नाही?” आणखीन एका युजरने लिहिला आहे, “मला वाटत तो तिचा मुलगा असावा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.