नाद करा पण आमचा कुठं! सिगारेटची तलप खेकड्यालाही आवरेना... लोक म्हणाले, "भावा तुला कसलं इतकं टेन्शन आलंय?"; Video Viral
सोशल मिडियावर नेहमीच अनेक मजेदार आणि थक्क करणारे व्हिडिओज व्हायरल होत असतात. या व्हिडिओजमधील दृश्ये इतकी अनोखी असतात की, ते पाहून आपला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. असेच एक अनोखे आणि सर्वांना कोड्यात पाडणारे एक नवीन दृश्य सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यातील दृश्ये इतकी जबरदस्त आहेत की, ते पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही, कारण व्हिडिओमध्ये चक्क एक खेकडा सिगारेट ओढताना दिसून आला आहे. सिगारेटची सवय एकदा लागली की मग तिला सहजासहजी सोडता नाही असं म्हटलं जात पण याची तलप एका खेकड्यालाही येत असेल याचा विचार आपण आजवर कधीच केला नसावा. सिगारेच ओढणारा हा खेकडा आता सोशल मिडियावर सर्वांचेचे लक्ष वेधून घेत असून त्याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. चला यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात एक खेकडा आपल्याला दिसून येत आहे ज्याच्या हातात सिगारेट आहे. बरं खेकड्याने हा सिगारेट फक्त आपल्या हातात पकडला नाही तर पुढच्याच क्षणी मोठ्या तोरात तो हा सिगारेट ओढतानाही दिसून येत आहे. यानंतर पुढील दृश्यात आपल्याला हा खेकडा वेगाने तुरुतुरु पळताना दिसतो पण यावेळीही त्याच्या हातून सिगारेट काही सुटत नाही. सिगारेट पेटलेला असतो आणि मस्त धूर सोडत खेकडा या सिगारेटची मजा लुटत असतो. व्हिडिओतील ही दृश्ये यूजर्सना चांगलेच थक्क करत असून “खेकड्याला नक्की कसलं एवढं टेन्शन आहे” असा मिश्किल प्रश्न आता यूजर्स उपस्थित करत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @sunnykathuria.yt नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सिगारेटची पॉवर पाहा” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खेकडा पण डिप्रेशनमध्ये आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खेकड्याचं ब्रेकअप झालं वाटत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.