(फोटो सौजन्य: X)
जंगलात ताकदीचा विषय आला की सर्वात पहिलं नाव सिंहाचं येत! सिंह हा आपल्या बलाढ्य शक्तीमुळे ओळखला जातो त्याच्या शिकारीचा थरार फार जबरदस्त असतो, याचे अनेक व्हिडिओज देखील सोशल मीडियावर शेअर केले जातात ज्यातून तो किती शक्तिशाली आहे याचे उत्तम उदाहरण पाहता येते. त्याच्या या ताकदीमुळेच त्याला जंगलाच्या राजाची उपमा देण्यात आली आहे. आता सिंह जंगलाचा राजा तर सिंहीणही जंगलाची राणी झाली… याच सिंहिणीवर काही तरसांनी हल्ला केल्याचे दृश्य सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. यात तरसांच्या एका ग्रुपने एकट्या सिंहिणीवर हल्ला केल्याचे दिसून येत आहे पण जंगलातील हे दृश्य क्षणातच एक वेगळे वळण घेते जेव्हा अचानक तिथे सिंहाची एंट्री होते. चला पुढे सिंहाने काय केलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते यात एका सिंहिणीला तरसांच्या एका ग्रुपने वेढल्याचे दिसून येत आहे. तरस त्यांच्या धूर्तपणासाठी आणि कळपाच्या ताकदीसाठी ओळखले जातात. व्हिडिओमध्ये तरस सिंहिणीला घेरून तिच्यावर हल्ला करण्याचा विचार करत असल्याचे दिसते, सिंहीण एकटी पडली असल्याने तीही घाबरून जाते पण तितक्यातच तिथे सिंह येतो. आता जंगलाचा राजाच आल्यांनतर तरसांच त्याच्यापुढे कायच चालणार. सिंह गर्जना करत संपूर्ण ग्रुपवर चढतो आणि संपूर्ण तरसाच्या ग्रुपला तिथून पळवून लावतो. अखेर शिकारीच्या या खेळात जंगलाच्या राजाचाच विजय होतो आणि व्हिडिओच्या शेवटी तरस तिथून आपला जीव वाचवत पळताना दिसून येतात. एखाद्या चित्रपटाच्या सीनप्रमाणे दिसणारे हे दृश्य ज्यात हिरो येऊन आपल्या हिरोईनचा जीव वाचवतो आणि एका हॅपी एंडिंगसह दृश्य संपते, हे आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
👉Her partner answered her call!👍 pic.twitter.com/JUUy6xqzr4
— 👉Never GiveUp👍 (@Never_Give_Uupp) May 19, 2024
आईच्या मायेपुढे हरला राक्षस! वासरला वाचवण्यासाठी बिबट्याशी गाईचे दोन हात; थरकाप उडवणारा Video Viral
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @Never_Give_Uupp नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “व्वा, शेवटी तो जंगलाचा राजा आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सिंहाने आपल्या सिंहिणीचे प्राण वाचवले” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तरस विसरले की तिथे फक्त सिंहाचे राज्य चालते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.