अबब! समुद्रात नाही तर अवकाशात दिसून आली ढगांची लाट, अद्भुत दृश्यांनी सर्वच हादरले; तुम्ही पाहिलात का Viral Video
तुम्ही आजवर समुद्रात उसळणाऱ्या लाटा बऱ्याचदा प्रत्येक्षात पहिल्या असतील. याचे व्हिडिओ देखील बऱ्याचदा सोशल मीडियावर शेअर केले जातात मात्र आता एक अद्भुत चमत्कार घडून आला आहे ज्यातील दृश्ये पाहून सर्वांचेच डोळे खुलेच्या खुले राहिले. हे दृश्य इतके अनोखे आणि दुर्लभ आहे की पाहणाऱ्याने मनभरून डोळ्यात साठवून ठेवले. वास्तविक, पोर्तुगालच्या समुद्रकिनाऱ्यावर हे दृश्य दिसले आहे ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर केला गेला आहे. व्हिडिओ शेअर होताच लोक या दृश्यांनी आश्चर्यचकित झाले आणि अवघ्या काही क्षणातच हा व्हिडिओ व्हायरल झाला. आता व्हिडिओत नक्की काय दिसले ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
पावसाळ्यात बऱ्याचदा आभाळ भरत आणि मुसळधार पाऊस पडू लागतो. यावेळी बऱ्याचदा समुद्रकिनारी लाटाही उसळत असतात ज्यामुळे अनेकदा लोकांना या ऋतूत समुद्रकिनारी जाण्यास मनाई केली जाते. मात्र पोर्तुगालच्या पोवोआ दा वर्झिम समुद्रकिनारी फक्त समुद्राच्या लाटाच नाही तर अवकाशात ढगांच्या लाटाही उसळताना दिसून आल्या जे पाहून सर्वांचेच डोळे विस्फारले. आजवर आपण समुद्रात उसळणाऱ्या लाटा पहिल्या आहेत मात्र ढगांमध्ये ओसंडून उसळणाऱ्या लाटांचे दृश्य सर्वांसाठीच फार नवे आणि अद्भुत आहे. पोर्तुगालमध्ये तीव्र उष्णतेचे वातावरण असतानाच अवकाशात हे अनोखे दृश्य दिसून आले.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अटलांटिक महासागरातून एक प्रचंड, जाड आणि दंडगोलाकार ढग समुद्राच्या दिशेने किनाऱ्याकडे येत आहे. ढग किनाऱ्याकडे येताच जोरदार वारे वाहू लागतात, ज्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील लोक आश्चर्यचकित होतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, ढगांमध्ये उसळणाऱ्या या लाटांना रोल क्लाउड असे म्हटले जाते. विशिष्ट हवामान परिस्थितीत गुंडाळलेले ढग तयार होतात. जेव्हा उबदार आणि दमट हवा वर येते आणि थंड हवेशी टक्कर देते. यामुळे हवेच्या दाबाचे एक प्रकारचे संतुलन निर्माण होते ज्यामुळे ढगांना दंडगोलाकार आकार मिळतो. हे ढग बहुतेकदा वादळापूर्वी किंवा समुद्रकिनाऱ्यांजवळ दिसून येतात. ढगांमध्ये उसळणाऱ्या या लाटा भीतीदायक वाटू शकतात मात्र हे सहसा धोकादायक नसते ते फक्त वातावरणातील बदलाचे लक्षण प्रतिबिंबित करत असते.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.