(फोटो सौजन्य: X)
स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी! ही म्हण तर तुम्ही अनेकदा ऐकली असेल. आईसारखं निस्वार्थी प्रेम आपल्यावर कुणीही करू शकत नाही. वेळेला कठोर वागणारी आई आपल्या सुरक्षेची वेळ आली तर सर्वात आधी ढाल बनून आपल्यासमोर उभी राहते. जगात आईचे प्रेम अनन्यसाधारण आहे. आता आईचे हे प्रेम फक्त माणसांमध्येच नाही तर प्राणी पक्ष्यांमध्येही सारखेच असते. जीव कोणताही असो आईच आपल्या मुलांवरच प्रेम कमी होत नाही. जगातील प्रत्येक सुख आपल्या झोळीत टाकणारी आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. आपल्या मुलांच्या वाटेला कोणी आलं किंवा त्यांना त्रास देऊ पाहिलं तर आईचं भयानक रूप पाहायला मिळत आणि सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्येही असेच काहीसे दिसून आले आहे. चला नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात एक कावळा गरुडाच्या घरट्यावर वाईट नजर ठेवून त्याच्या पिल्लांना आपली शिकार बनवण्याच्या उद्देशाने घरट्याजवळ जातो. यानंतर आपल्या चोचीने एका पिल्लावर तो हल्ला करत निर्दयपणे त्याला फाडून फाडून खाण्याचा प्रयत्न करू लागतो. शेवटी त्याच्या शरीराचा एक भाग हातात घेऊन तो तिथून निघून जातो आणि तितक्यात गरुडाच्या आईची तिथे एंट्री होते. आपल्या पिल्लाची झालेली वाईट अवस्था पाहून ती फार दुखावते आणि लगोलग याचा बदला घेण्यासाठी कावळ्याच्या मागे पळत पळत जाते. आपल्या वेगाने ती कावळ्याचा रस्त्याच्या कडेला पाडते आणि आपल्या चोचीने अगदी ज्याप्रमाणे कावळा तिच्या पिल्लाची शिकार करतो त्याचप्रमाणे त्याला मारून टाकते. आईच्या प्रतिशोधाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आपल्या मुलासाठी आई कोणत्या थराला जाऊ शकते ते आपल्याला या व्हिडिओतून पाहायला मिळते.
الغراب تعدى حدوده، ولكن النسر اقتص لفراخه
😮😮pic.twitter.com/xxuZXp8mbz— عالم الحيوان (@animals5s) January 19, 2025
घटनेचा हा व्हिडिओ @animals5s नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आई कुणाचीही असो, ती आपल्या लेकरांसाठी आगीतही उडी” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आई म्हणजे काय असते याचं ज्वलंत उदाहरण”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.