(फोटो सौजन्य: Instagram)
अनेकदा काही नवीन करू पाहावं म्हणून लोक नको ते प्रकार करू पाहतात. आपले साहस दाखवून देण्यासाठी ते भयानक स्टंट्स करतात मात्र प्रत्येक वेळीच तुमचा जीव यातून वाचेल असं नाही. अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ज्यातील दृश्ये तुमचा काळजाचा ठोका चुकवतील. आपल्या जीवाची पर्वा न करता तरुण लोक साहसी खेळ खेळायला जातात आणि आपल्या जीवाचाच खेळ मांडून बसतात. त्यांचा हा क्षणिक आनंद कधी त्यांचा जीव घेतो त्यांना समजतही नाही काही सेकंदातच होत्याच नव्हतं घडत. चला या व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.
पांचट Jokes: पाहुणे की इज्जतीचा पंचनामा? वाचलंत तर हसून हसून पोट दुखेल
काय घडलं व्हिडिओत?
सध्याच्या काळात तरुणाईमध्ये बंजी जंपिंग या साहसी खेळाचे आकर्षण फार वाढले आहे. हा खेळ जितका मजेदार वाटतो तितकाच तो थरारकतेने भरलेला आहे. अनेक पट उंचीने खोल दरीत आपल्याला खाली फेकले जाते आणि एका दोरीच्या साहाय्याने आपण लटकत असतो. विचार करा ही दोरीच तूटली तर काय होईल… बंजी जंपिंग करताना अनेकांनी आपला जीव गमावला आहे आणि आताही काहीसे असेच घडून आले आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण मुलगी बंजी जंपिंग करताना दिसून येते. इतक्या उंचावरून बंजी जंपिंग करताना ती अगदी आनंदात आणि कॉन्फिडंट दिसते मात्र जशी ती खाली उडी मारते तिचे शरीर तरंगू लागते आणि असे वाटते की जणू तिच्यात प्राणच राहिले नाही. दोरीला लटकत तिचे शरीर इकडून तिकडे फिरत राहते. व्हिडीओच्या कॅप्शननुसार बंजी जंपिंग केल्यानंतर तिच्या मानेचं हाड मोडलं आणि त्यामुळे या तरुणीचा मृत्यू झाला आहे. ही घटना नक्की कुठली आहे ते अद्याप समजू शकलं नाही.
हा व्हायरल व्हिडिओ @official_the_original_files नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मग बढाई मारण्याची काय गरज होती? तुम्हाला माहिती आहे की ते एक धोकादायक काम आहे पण तरीही लोक ते करतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला हे समजत नाही की लोकांना हे असं करून काय मिळत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आयुष्य खूप मौल्यवान आहे, अशी फालतू गोष्ट का करावी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.