महिलेचा भांडी घासण्यासाठी अनोखा जुगाड
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. जुगाडाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. अनेकदा लोक असे जुगाड करतात की आपण कौतुक केल्याशिवाय राहत नाही. तर अनेकदा असे जुगाड करतात की आपल्याला हसू आवरता येत नाही.
जुगाड करणाऱ्यांचे म्हणणे असते की, यामुळे त्यांचा वेळीही वाचतो आणि पैसेही. मात्र अनेकदा भन्नाट जुगाडाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका महिलेने भांडी धुण्यासाठी असे काही जुगाड केला आहे की, व्हिडिओ पाहून लोक चकित झाले आहेत. अनेकांना त्यांचे हसू आवरता आले नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये नेमके काय?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला भांडी धूताना दिसत आहे. तिच्या समोर काही भांडी एका टपामध्ये ठेवली आहेत. तर एका छोट्या टपात पाणी आहे.महिलेने पाण्याच्या नळाला पाईप जोडला आणि पाईक स्कार्फने डोक्यावर बांधला आहे. आणि पाणी चालू केल्यानंतर पाणी येऊ लागले. यानंतर महिलेने एकामागून एक सर्व भांडी साफ केली आहेत. एवढेच नाही या जुगाडाने महिलेने कपडेही धुतले. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
महिला है कुछ भी कर सकती है मतलब कुछ भी 🤷♀️🤷 😂😂 pic.twitter.com/xu2FzaahGa — दिव्या कुमारी (@divyakumaari) October 2, 2024
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @divyakumaari या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शएअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ती एक महिला आहे, ती काहीही करू शकते. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत. एक युजरने म्हटले आहे की, हा भांडी धुण्याचा योग्य मार्ग आहे, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, मल्टी टास्क सोबतच मल्टी टॅलेंट देखील आणखी एका युजरने म्हटले आहे की, काय टॅलेंट आहे. तर एका युजरने असे म्हटले आहे की, यांना अशा भन्नाट आयडिया सुचतात कशा? असा प्रश्न त्याने केला आहे.