फोटो सौजन्य: सोशल मीडिया
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा सत्य घटनांचे व्हिडिओ देखील आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर इराण-इस्त्रायल युद्धाचे व्हिडिओ सोशल मीडिया पाहायला मिळत आहेत. इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला होता. इराण आणि इस्रायलमध्ये सुरू झालेल्या संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणाव निर्माण झाला असून जागतिक युद्धाची भीती आहे.
हल्ले होत असताना लग्न सुरू होते
दरम्यान इस्त्रायलमध्ये हल्ला सुरू असताना एका जोडप्याचे लग्न सुरू होते. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. व्हायरल फोटोमध्ये इस्त्रायवर क्षेपणास्त्रे आकाशातून येत आहेत आणि खाली एक इस्रायली जोडपे लग्न करत असल्याचे दिसत आहे. हा फोटो कधी काढला याबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र, तो शेअर करणाऱ्या युजरने दावा केला आहे की, इस्रायलवर हल्ले होत असतानाचे हे फोटो आहेत.
लग्नही बंकरमध्येच झाले
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही असाच एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक जोडपे बंकरमध्ये लग्न करताना दिसत आहे. फोटो शेअर केलेल्या युजरने म्हटले आहे की, ‘शेकडो इराणी क्षेपणास्त्रेही या ज्यू जोडप्याला लग्न करण्यापासून रोखू शकली नाहीत. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यान एका सुरक्षित खोलीत त्यांचा विवाह सोहळा पार पडला. प्रेम जिंकले. हल्ल्यातही आम्ही नाचतोय.’
Hundreds of Iranian missiles couldn’t stop this Jewish couple from getting married.
Their Chuppah ceremony took place in safe room during the Iranian missile attack.
♥️ LOVE wins.
We ARE Dancing Again. 🇮🇱 pic.twitter.com/OzZGd9NRzH
— Daniel Kraus (@rabbidkraus) October 1, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
यातील काही फोटो इन्स्टाग्रामवर कर काही फोटो एक्सवर व्हायरल होचाना दिसत आहेत. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, मी जर असतो तर पहिल्यांदा तिथून स्वत: चा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला असता. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, प्रेम सोबत असल्यावर कोणत्याही गोष्टीचा भिती वाटत नाही, आणखी एका युजरने म्हटले आहे की, खरे आहे की, प्रेम असल्यावर कोणत्याही गोष्टीची भिती वाटत नाही, तसेच कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आनंदात जगता आले पाहिजे, तर एका युजरने म्हटले आहे की, प्रेम वैगेरे राहू द्या बाजूला अचानक त्यांच्यावर हल्ला झाला तर सगळा आनंद दुख:त बदलेले.