केरला स्टोरी (Kerala Story) सिनेमानंतर देशात हिंदू मुस्लिम (Hindu Muslim) हा विषय नव्याने चर्चेत आला आहे. बिहारची राजधानी पाटण्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. मुस्लिम वर्गमैत्रिणीला बाईकवर बसवल्याने एका हिंदू तरुणाला काही लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओही शूट करून तो सोशल मिडियावर व्हायरल केला आहे.
[read_also content=”अखेर ठरलं! सिद्धरामय्या मुख्यमंत्री, डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री; राहुल गांधी 1 वाजता करणार घोषणा, उद्या 10 मंत्र्यांसह शपथविधी an”]
15 मे रोजी बिहारच्या पाटणा शहरात एका मुलगा सागर कुमार मिश्रा नावाचा तरुण आपल्या मुस्लिम वर्गमित्रासह दुचाकीवरून कुठेतरी जात होता. यावेळी काही तरुणांनी त्याची दुचाकी थांबवली आणि त्याला कुठे जातोय अशी विचारणा केली. दरम्यान त्याने स्वताच नाव सांगितल्या नंतर जमावाने त्याला हिंदू असून मुस्लीम मुलीसोबत फिरतोस काय?’ असं म्हणत शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मुस्लिम मुलीलाही विरोध करताच तिला घरी जा असं सांगण्यात आले
*Abusive Content*
A Hijab wearing muslim girl was on a bike with a Hindu guy in Patna. Few people stopped them, abused and beaten the boy badly.
Goons shouted “Muslim ki Ladki ko ghumayega”
Girl kept saying he’s classmate, she was told “Muslim ladki hoke kya kar rahin hain ye” pic.twitter.com/ndZ5SczIyN
— Ankur Singh (@iAnkurSingh) May 15, 2023
तरुणांनी युवकाला मारहाण करताना व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मिडियावर व्हायरल देखील केला. ज्यामध्ये जमाव एका मुस्लिम मुलीसोबत फिरत असल्याबद्दल हिंदू मुलाला निर्दयपणे मारहाण करताना दिसत आहे. तसेच त्याला शिवीगाळ करतानाही दिसत आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये ही मुस्लिम मुलगी जमावाला हिंदू तिच्या मित्राला मारण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. “तो माझा वर्गमित्र आहे, बॅचमेट,” मुलगी म्हणाली. मात्र, जमावाने तिच न ऐकता तिला तिच्या
घरी जाण्यास सांगितले. “आप क्या कर रही है आपको मालूम है? (तुम्ही काय करत आहात हे तुम्हाला माहीत आहे का). घर कहा हुआ आपके? आप घर जाईये (तुम्ही कुठे राहता? तुम्ही कृपया घरी जा),” असं जमाव तिला म्हणाला.