जन्मताच नवजात बाळाला चक्क मिशी अन् हनुवटीवर...! आई-बाबा म्हणाले...; VIDEO पाहून नेटकरी चक्रावले
व्हायरल व्हिडीओमध्ये रुग्णालयातील खोलीसारख्या ठिकाणी निळ्या चादरीच्या बेडवर एक नवजात बाळ झोपलेले दिसते. बाळाला टॉवेलमध्ये गुंडाळलेले असून, त्याच्या डोक्यावर काळे केस दिसतात. व्हिडीओमध्ये बाळ कधी डोळे उघडताना, तर कधी मान हलवताना दिसते. एका महिलेने बाळाला स्पर्श केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर हलके स्मित उमटल्याचेही दिसते.
मात्र, या व्हिडीओमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहे ते बाळाच्या चेहऱ्यावरील मिशांसारखी दिसणारी आकृती आणि हनुवटीवरील केस. बाळाच्या चेहऱ्यावरील गंभीर हावभावांमुळे नेटकरी त्याची तुलना एखाद्या प्रौढ व्यक्तीशी करत आहेत. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
Baby born with mustache spark reaction online. 😳😳😳😳😳😳😳
@grok is this real or AI?????? https://t.co/LFadLhpHjY — PANSO QUEEN 🌼🐝 (@Niinameelah) October 23, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ टिकटॉकवर @Chevisjunior या युजरने शेअर केला होता. त्यानंतर तो इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हायरल झाला. एक्सवर @Niinameelah या युजरने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे या चर्चेला आणखी वेग मिळाला.
मात्र, या बाळाचा जन्म नेमका कुठे झाला, व्हिडीओ कधी व्हायरल करण्यात आला आणि त्यातील दृश्ये खरी आहेत की कृत्रिमरीत्या तयार केली आहेत, याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे बाळाचा जन्म खरोखरच मिशांसह झाला, असा दावा खात्रीने करता येत नाही.
या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही जण बाळाच्या चेहऱ्यावरील मिशा पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत, तर काही जण हा व्हिडीओ AI च्या मदतीने तयार करण्यात आल्याचे सांगत आहेत.
एका युजरने, ‘असं कसं शक्य आहे?’ असा प्रश्न उपस्थित केला. तर दुसऱ्या युजरने हा AI व्हिडीओ असल्याचे सांगत, लोक यावर विश्वास कसा ठेवतात, असा सवाल केला. एका युजरने तर स्वतःच्या मिशांशी तुलना करत विनोदी प्रतिक्रिया दिली. अनेकांनी ‘AI ने तर हद्दच केली आहे’, अशा शब्दांत या व्हिडीओवर भाष्य केले.
एकूणच, मिशा आणि हनुवटीवरही केस असल्याचा दावा केला जाणाऱ्या या नवजात बाळाच्या व्हिडीओने सोशल मीडियावर उत्सुकता निर्माण केली आहे. मात्र, व्हिडीओची सत्यता आणि त्यामागील वस्तुस्थिती स्पष्ट होईपर्यंत त्यातील दृश्यांना खरे मानणे योग्य ठरणार नाही.
Viral Video: आजींचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर असा ठेका धरला की VIDEO पाहतच राहाल






