
Ajit Pawar
चार दिवसांपूर्वी एका सार्वजनिक सभेत बोलताना अजित पवारांनी काही असे शब्द बोलेले होते जे आज ऐकून लोकांच्या डोळे पाणावत आहेत. कारण ते शब्द सत्यात उतरतील अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. अजित पवार यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की, मित्रांनो हे जग कायमचे राहणार आहे, पण तुम्ही-आम्ही आज असू उद्या नसू. काळाचं, नियतीचं बोलावणं आलं की प्रत्येकाला जावं लागतं… उपमुख्यंत्र्यांचे हे उद्गार आज सत्यात उतरले आहे. त्यावेळी हे भाषण ऐकताना कोणालाही असे काही घडेल असे वाटले नव्हते. त्यांनी असेही म्हटले आहे की, राजकारण हे सर्वस्व नसतं, निवडणुका येतील जातील. आपण हयात आहोत तोपर्यंत लोकांच्या हीताची कामे करत राहायची.
सध्या अजित पवारांच्या या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण भावूक झाले आहे. दादा इतक्या लवकर सोडून जातील असे वाटले नव्हते असे शब्द लोकांच्या तोंडून बाहेर पडत आहेत. अगदी विरोधकांचेही डोळे पाणावले आहे. महाराष्ट्राचा एक धडाकेबाज, कणखर नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. ज्या मातीत त्यांना घडवलं त्याच मातीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.