
Union Home Minister Amit Shah arrives in Baramati for Ajit Pawar funeral live news
Ajit Pawar funeral live : बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीमध्ये निधन झाले आहे. काल (दि.28) बुधवारी सकाळी ८.४५ वाजता बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान चार्टर्ड विमान अपघातात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. या दुर्घटनेत पवारांचे सुरक्षा रक्षक, दोन पायलट आणि एक महिला क्रू मेंबरसह एकूण ५ जणांना जीव गमवावा लागला. बारामतीत आज सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवारांवर अंतिम संस्कार केले जात आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आस्कमित निधनामुळे महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. पवार कुटुंबासाठी देखील ही गोष्ट अत्यंत धक्कादायक आहे. संपूर्ण पवार कुटुंब, बारामतीकर एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागिरक दादांच्या जाण्यामुळे शोकाकुल झाले. अनेक दिग्गज नेत्यांनी बारामती येथे जाऊन अजित पवारांचे अंत्यदर्शन घेतले. पवार कुटुंबियांची भेट त्यांचे सांत्वन केले आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह हे देखील बारामतीमध्ये दाखल झाले आहे. अमित शाह हे बारामती विमानतळावर दाखल झाले.
हे देखील वाचा : मुख्यमंत्रीपदाच्या अपूर्ण स्वप्नांसह अजितदादांचा जगाला निरोप! काका करू शकले असतं स्वप्नं पूर्ण पण…
विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला जात आहे. अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात असून संपूर्ण मैदानावर समर्थकांची अलोट गर्दी जमली आहे. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आसवांचा पूर आला असून प्रत्येकाच्या ओठी एकच वादा अजित दादा अशा घोषणा आहेत. अजित पवारांच्या अंतिम दर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दाखल झाले आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रशेखर बावनकुळे असे राजकीय नेते उपस्थित आहेत.
हे देखील वाचा : बारामतीत लाखोंच्या संख्येने लोटला जनसमुदाय; थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार
सुनेत्रा पवार यांच्यावर दुःखाचा डोंगर
खासदार सुनेत्रा पवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अजित पवार यांच्या अंत्यविधीवेळी सुनेत्रा पवार यांनी साश्रू नयनांनी भावनिक निरोप दिला आहे. यावेळी संपूर्ण पवार कुटुंबाने अत्यंत जड अंतःकरणाने अजित पवारांना निरोप दिला आहे.