हायवे रोडच्या साइनबोर्डवर पुल-अप करताना तरूण
सध्या सोशल मीडियाच्या जगात आपल्याला कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा लोक रील बनवण्यासाठी, सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्यासाठी असे काही करतात की, ज्यामुळे धक्का बसतो. असे रील्स सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात. अनेकदा लोकांच्या लक्षात येत नाही की, त्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. विषेषत: तरूणांमध्ये असे धोकादायक स्टंट करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरूण धोकादायक स्टंट करताना दिसत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ उत्तरप्रदेशातील अमेठीचा आहे. ज्यामध्ये एक तरुण 30 मीटर उंच हायवेच्या साईनबोर्डवर चढून असे काही करत आहेत की, हे पाहून लोकांना धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी विजेच्या खांबावर चढून, तर एकजण ट्रॅक्टरच्या मागच्या बाजूला लटकून पुलअप करत होते. असाच काहीसा हा सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरून उत्तरप्रदेशातील अमेठी-मुंशीगज हायवेवर साईन बोर्डवर लटकलेला दिसत आहे. हा साईनबोर्ड 30 मीटर उंचीचा आहे. तरूण साईनबोर्डवर शर्टलेस होऊन व्यायाम करताना दिसत आहे. तो पुलअप करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अलीकडे लोकांना रील बनवण्याची क्रेझ लागली आहे. ज्यामुळे काही लोकांनी आपला जीव गमवला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर RajuMishra63 अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडिओ
अमेठी के युवा बड़े बाजीगर। रील के चक्कर मे 10 मीटर ऊंचे साइन बोर्ड पर चढ़कर पुशअप करता युवक। वीडियो वायरल।#अमेठी pic.twitter.com/PFRAFjBYda
— राजू मिश्र / Raju Mishra (@RajuMishra63) September 29, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
अमेठीचा हा व्हिडिओ पोस्ट झाल्यापासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकीकडे हे दृश्य पाहून काही यूजर्स रोमांचित झाले आहेत, तर दुसरीकडे काही लोक या तरूणाला मुर्ख म्हणत आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘भाई, खाली ये’ तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, जर त्याचा हात सटकला तर त्याला अक्कल येईल, तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, भाऊ, काय प्रकार आहे हा? जिममध्ये जाऊन असले स्टंट करा, चौथ्या एका युजरने म्हटले आहे की, अशा लोकांवर शासमाने कारवाई केली पाहिजे, यामुळे नव्या पिढीला चुकीचा संदेश मिळत आहे.