
super cars in delhi viral video
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हि़डिओमध्ये तुम्ही पाहू शकता दिल्लीच्या रस्त्यांवर महागड्या, सुपर स्पोर्टकार दिसत आहे. त्यांच्या डिझाइन्स, आकर्षक रंग, ग्रीउंड क्लीयरन्स पाहून लोक थक्क झाले आहे. लोक हे दृश्य बघण्यासाठी खास थांबत आहेत. हिरवा, पिवळा, काळ्या, निळ्या, गुलाबी रंगाच्या या स्पोर्ट्स कार्सनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. लोक हे दृश्य आपल्या कॅमेरात कैद करत आहे. सर्वजण थांबून हे दृश्य पाहत थक्क झाले आहे. दिल्लीच्या रस्त्यांवर असा नजारा पाहायला मिळणे फार दुर्मिळ आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @onlysupercarslover या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. एका नेटकऱ्याने हे दिल्ली आहे की दुबई असा प्रश्न केला आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने या गाड्या किती रुपयांच्या असतील अशी चर्चा सुरु केली आहे. तर एकाने पूर्ण पाकिस्तानचा GDP असे म्हटले आहे. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहे. अनेकांना या कार्स पंसत पडत आहे. सध्या या सुपर स्पोर्ट्स कार्सच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे.
वाह क्या जुगाड है! भाजी घुटण्यासाठी पठ्ठ्याने थेट वापरली ड्रिल मशिन; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.