
Desi Juggad Video
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक स्वयंपाक घरात आपल्या आईची मदत करत आहे. या तरुणाने ड्रील मशिन घेतली असून त्याने तो भाजी घुटताना दिसत आहे. सहसा भाजी घुटण्यासाठी त्याची मशिन वापरली जाते. परंतु या तरुणाने भलताच जुगाड केला आहे. ड्रिलिंग मशिनला भाजी घुटण्याचे यंत्र जोडले आहे. तरुणा या मशिनने पालकची भाजी घुटताना दिसत आहे. तुम्ही पाहू शकता की, त्याने थेट कुकरमध्ये ड्रिलिंग मशिन फिरवली आहे. त्याची आई देखील हे पाहून हैराण झाली आहे. तरुणाची आई त्याला असे न करण्यास सांगत आहे, पण तरुण तिचे ऐकता थेट ड्रिलिंग मशिनने भाजी घुटत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @kajalvaishnav या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स केला आहेत. एका नेटकऱ्याने हा जुगाड भारताबाहेर गेला नाही पाहिजे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने पाज्जी हे फक्त तुम्हीच करु शकता असे म्हटले आहे. आणखी एका नेटकऱ्याने वाह, काय जुगा आहे असे म्हटले आहे. तर काहींनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.