
इंग्रज बाबू लंडनच्या रस्त्यावर विकतोय 'झलमुरी'!
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियावर शेअर केलेले काही कायमच ट्रेंडिंगला असतात. वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखण्यासाठी भारतासह देश विदेशातील पर्यटक कोलकत्तामध्ये कायमच जातात. तिथे असलेले चटपटीत आणि आंबटगोड पदार्थ कायमच चर्चेत असतात. त्यातील अनेकांना आवडणारा पदार्थ म्हणजे झलमुरी. मात्र झलमुरी हा पदार्थ कोलकत्ता आणि भारतापुरता मर्यादित राहिलेला नसून लंडनच्या रस्त्यांवर सुद्धा विकला जात आहे. लंडनमधील एका माणसाने कोलकाता स्टाईलमध्ये झलमुरी विकल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो याआधी काम करत होता, मात्र नोकरी सोडल्यानंतर त्याने झलमुरी विकायला सुरुवात केली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कोलकत्तामधील प्रसिद्ध झलमुरी विकताना दिसत आहे. त्याने एक स्टीलच्या भांड्यात कुरकुरीत मुरमुरे आणि त्यानंतर त्यात हिरवी चटणी, वेगवेगळे मसाले, आंबटगोड चिंच चटणी, बारीक चिरलेला कांदा, काकडी आणि इतर भाज्या टाकून झलमुरी मिक्स करत आहे. सगळ्यात शेवटी तयार केलेल्या संपूर्ण मिश्रणावर लिंबाचा रस टाकून मिक्स केले.
सोशल मीडियावर शेअर करण्यात असलेल्या व्हिडिओवर अनेकांना कमेंट्सचा पाऊस पडला आहे. “तो चाकू येईपर्यंत तसाच आहे.” दुसऱ्याने विनोद केला, “काकांनी झलमुरी मार्किंगमध्ये ६ महिन्यांचा डिप्लोमा पूर्ण केला.” एका वापरकर्त्याने कमेंटमध्ये लिहिले, “मला त्याची कहाणी जाणून घ्यायची आहे.” अशा असंख्य कमेंट्स त्याच्या व्हिडिओवर करण्यात आल्या आहेत.
“ब्रिटिशांनी २०० वर्षे भारतावर कब्जा केला. “भावाने तर सामान ठेवण्यासाठी मग (मग) आणि प्लास्टिकच्या बाटल्या वापरल्या. मला १००% खात्री आहे की त्याची चव स्थानिक सारखीच असेल.” या झलमुरी व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटते?शेवटी, झलामुरी ही भारतीय स्ट्रीट फूड विक्रेत्यांप्रमाणेच वर्तमानपत्रापासून बनवलेल्या क्लासिक सर्व्हिंग कोनमध्ये तयार करण्यात आली. विक्रेत्याने मिश्रणात चिंचेची चटणी घालून ती भुजिया आणि मसाल्यांनी सजवली. व्लॉगरने या डिशचे वर्णन “कोलकाता शैलीतील, लंडनमधील प्रामाणिक आणि मसालेदार झलामुरी” असे म्हणत कमेंट केली आहे. लंडनमधील झलमुरी विकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ पाहून अनेक लोक आश्चर्यचकित झाले आहेत.