(फोटो सौजन्य – X)
लग्नाचा अनोखा थाट
व्हिडिओतील उल्लेखनीय गोष्ट म्हणजे इतकी भव्य व्यवस्था असूनही, जेवणाची परंपरा अगदी साधी होती. पाहुण्यांना पारंपारिक ताटात दक्षिण भारतीय जेवण सर्व्ह केले गेले होते, ज्यामुळे मेजवानीत संस्कृती रुजलेली राहील. म्हणूनच लोक या कार्यक्रमाला परंपरा आणि भव्यतेचे परिपूर्ण मिश्रण म्हणत आहेत. व्हिडिओमध्ये प्रत्येकजण आपल्याला स्वतःच्या शाही सिंहासनावर बसून मेजवानीचा आनंद लुटताना दिसून आला. हे दृश्य पाहून युजर्सने याला “शाही दरबारातील मेजवानी” असे वर्णन केले तर काहींनी “साधेपणासह भव्यतेचे प्रदर्शन” असे म्हटले. दरम्यान सोन्याचे दिसून येणारे हे सिंहासन खऱ्या सोन्याचे नसून यावर सोन्याचा फक्त रंग दिल्याचा अंदाज आहे. मात्र तरीही याची सुंदरता नाकारण्याजोगी नाही.
मेहमानों की इतनी खातिरदारी तो मुकेश अंबानी भी नहीं कर पाए थे। pic.twitter.com/p51F5NoKMp — Dr. Sheetal yadav (@Sheetal2242) December 8, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @Sheetal2242 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मुकेश अंबानी देखील पाहुण्यांची इतकी चांगली काळजी घेऊ शकले नाहीत’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “छान. हे यजमानांचे पैसे आहेत आणि ते कसे खर्च करायचे ही त्याची इच्छा आहे. जोपर्यंत ते भारतात खर्च केले जाते तोपर्यंत ते मला आनंद देते कारण ते अर्थव्यवस्थेत योगदान देते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण हा दिखावा का? ” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे निश्चितच एका वेगळ्या प्रकारचे आदरातिथ्य आहे, पण नक्की हे काशासाठीच आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






