Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं… मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral

Lift Accident Video : लिफ्टमधून बाहेर पडताना महिलेला मृत्यूने घेतलं ओढून... घटना आंध्र प्रदेशच्या एका अपार्टमेंटमध्ये घडली असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर सर्वांनाच हादरवून सोडत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 22, 2026 | 09:13 AM
लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं... मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral

लिफ्ट उघडली अन् मृत्यूने गाठलं... मुलगी-नातवासमोर दरवाजातच चिरडली गेली ५० वर्षीय महिला; घटनेचा थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • लिफ्टमधून बाहेर पडताना नेमकं काय घडलं?
  • सीसीटीव्हीत कैद झाला अंगावर काटा आणणारा अपघात
  • घटनेनंतर सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित
आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. लिफ्टमधून बाहेर पडताना एक ५० वर्षाय महिला अपघाताला बळी पडली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मिडियावर शेअर करण्यात आले असून यातील दृष्ये कुणाच्यीही अंगावर काटा आणू शकतात. मुख्य म्हणजे ही घटना घडली तेव्हा घटनास्थळी महिलेची मुलगी आणि नातू उपस्थित होते. लिफ्टमधून मुलाला घेऊन मुलगी बाहेर पडली पण जेव्हा वृद्ध महिला यातून बाहेर निघू लागली तेव्हा अचानक लिफ्ट खाली जाऊ लागली आणि महिला मृत्यूच्या या सापळ्यात वाईटरित्या अडकली. चला या घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.

माणूस आहे की स्प्रिंग? कपड्यासारखं पिळवटून टाकलं शरीर, Viral Video पाहून बसेल धक्का

काय घडलं व्हिडिओत?

पोलिसांना प्राथमिक तपासात मृत महिलेची ओळख वनिता अशी पटली आहे. महिला प्रकाशम शहरातील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या आपल्या मुलीच्या घरी आली होती. अपघातावेळी तिची मुलगी आणि नातू देखील तिथे उपस्थित होते. त्यांना अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावर जायचे होते ज्यासाठी त्यांनी लिफ्टचा मार्ग निवडला. पहिल्या मजल्यावर पोहचल्यानंतर लिफ्टचे दार उघडले आणि सुरुवातील वनिताची मुलगी आणि नातू बाहेर पडले. यानंतर जेव्हा वनिता लिफ्टमधून बाहेर पडू लागली तेव्हा दारापर्यंत येईपर्यंतच अचानक लिफ्ट सुरु झाली आणि खालच्या बाजूला जाऊ लागली. यावेळी लिफ्टचे दरवाजे खुले होते तरीही लिफ्ट ऑटोमॅटीक खाली जाऊ लागली.

लिफ्ट अशी अचानक सुरु झाल्याने वनिता आणि लिफ्ट आणि शाफ्टच्या मध्ये वाईटरित्या चिरडली गेली. मुलीने मागे वळून जेव्हा हे दृष्य पाहिले तेव्हा ती घाबरली आणि तिने लिफ्टचे बटण दाबून लिफ्ट खोलण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड ऐकून आजूबाजूच्या लोकांनी येऊन मदत केली आणि वनिताला या परिस्थितीतून बाहेर काढले. या घटनेनंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात आता शोककळा पसरली असून अपार्टमेंटच्या सुरक्षा व्यावस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

‘आम्ही Gen-Z आहोत, हे सहन करणार नाही!’ लडाख चेकपोस्टवर तरुणीचा जवानावर संताप, Video Viral

पोलिसांनी दाखल केली एफआयआर

कुटुंबाच्या तक्रारीवर पोलिसांनी FIR दाखल केली असून लिफ्टमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का याचा तपास केला जात आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफार्म्सवर आतापर्यंत शेअर करण्यात आला असून सोशल मिडियावर यूजर्सच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका यूजरने म्हटले की, “दरवाजे बंद न होता लिफ्ट खाली कशी गेली?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जर त्या अजून थोडा वेळ तिथेच थांबल्या असत्या, तर त्या आई आणि मुलालाही आत ओढून नेले गेले असते… मुलाला उचलून घेऊन तिथून तातडीने निघाल्यामुळेच कदाचित त्यांचे प्राण वाचले… काकूंना भावपूर्ण श्रद्धांजली”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “लिफ्टमध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही, त्यामुळे शक्य तितक्या लवकर बाहेर पडणेच उत्तम”.

Web Title: Andhra pradesh lift accident woman dies cctv viral video incident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 09:13 AM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बंगळुरूमध्ये थरार! फूटपाथवरून ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट! तरुण गंभीर जखमी; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral
1

बंगळुरूमध्ये थरार! फूटपाथवरून ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट! तरुण गंभीर जखमी; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
2

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
3

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
4

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.