अस्वलाचं पिल्लू समोर येताच सिंह झाला गपगार, मागच्या मागेच असा काढला पळ... पाहून तुम्हीही पोट धरून हसाल; Video Viral
सोशल मीडियावर सध्या एक आश्चर्यकारक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वाघ आणि अस्वलाच्या पिल्लाची एक अनोखी भेट दिसून आली. यानंतर काय घडले असावे याचा विचार करा… मुळातच वाघ हा जंगातील सर्वात धोकदायक प्राण्यांपैकी एक आहे. त्याच्या प्रचंड ताकदीमुळे त्याला जंगलाचा राजा म्हटले जाते मात्र हाच जंगलाचा राजा नुकताच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अस्वलाच्या पिल्लापासून घाबरून पाळताना दिसून आला. हे मनोरंजक दृश्य पाहणं फार मजेदार ठरतं.
जंगलातील अनेक मजेदार व्हिडिओज सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. मात्र यात अधिकतर प्राण्यांमधील लढतीचे दृश्य दिसून येते. हे दृश्य अनेकदा आपल्याला थक्क करतात मात्र आताचा हा व्हायरल व्हिडिओ काहीसा अनोखा आहे, यात जंगलाचा राजा स्वतःच एका चिमुकल्या अस्वलाच्या पिल्लाला पाहून पळ काढत असल्याचे दिसून आले. व्हिडिओतील रोमांचक दृश्ये पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओत नक्की काय घडलं ते जाणून घ्या.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात अस्वलाच्या भीतीने वाघ पळू लागल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. जंगलाचा राजा म्हणून ओळखला जाणारा वाघही अस्वलाच्या ताकदीपुढे शरण जातो हे पाहून लोक थक्क झाले. व्हिडिओमध्ये अस्वल आपल्या संपूर्ण ताकदीने आणि रागाने वाघाच्या दिशेने सरकते आणि वाघ घाबरून मागे हटतो आणि पळून जातो. अस्वलाचे उग्र रूप पाहून तो कोणालाच घाबरत नाही असे दिसते. हा क्षण इतका अनोखा आहे की लोकांना आश्चर्य वाटते की वाघासारखा शिकारी अस्वलाच्या पिल्लाला कसा काय घाबरला? हा व्हायरल व्हिडिओ जंगलाचे स्वतःचे नियम दाखवतो, जिथे शक्ती आणि धैर्य सर्वकाही ठरवते. वाघ हा नेहमीच सर्वात धोकादायक प्राणी मानला जातो, परंतु यावेळी अस्वलाने त्याला मागे हटण्यास भाग पाडले. जंगलात कुणीही कुणापेक्षा कमी नाही, हे या व्हिडीओतून लोक शिकत आहेत. ही अनोखी भेट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
जंगलाचा हा अनोखा व्हिडिओ @wild_life_animal_fight नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘अस्वलाला राग अनावर होतो आणि तो वाघाला पकडू लागतो’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते दोन शावक आहेत; चंद्रावरून येणारे अस्वल, जेव्हा ते प्रौढ होते तेव्हा ते खूप धोकादायक असते, पण मला वाटत नाही की ते वाघाशी स्पर्धा करू शकेल…’ तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आतापर्यंत मी पाहिलेला हा सर्वात मजेदार व्हिडिओ आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.