(फोटो सौजन्य: Instagram)
तुम्ही जर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही इथे अनेक व्हायरल व्हिडिओज पाहिले असतील. हे व्हायरल व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात, कधी भावुक करतात तर कधी थक्कही करतात. इथे अनेक असे व्हिडिओही व्हायरल होत असतात ज्याचा आपण कधी विचारही केला नसावा. कुत्रा हा मुळातच एक प्रामाणिक प्राणी म्हणून ओळखला जातो. मात्र एकदा का त्याच डोकं सटकलं की मग तो कुणालाही सोडत नाही. त्यातही पिसाळलेल्या कुत्र्यांची तर दहशतच वेगळी, आता इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एका कुत्र्याने चक्क विषारी सापावर हल्ला चढवल्याचे दिसून आले. कुत्र्याने सपाची अशी दुर्दशा केली की पाहून तुम्हीही आवाक् व्हाल.
प्राण्यांच्या भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला धडकीच भरेल. मुळातच कोब्रा हा सापांच्या सर्वात धोकादायक प्रजातींपैकी एक आहे, त्याचे विष कुणालाही सहज मृत्यूच्या दारी पोहचवू शकत. अशात मोठमोठे प्राणीही त्याच्या वाटेल जात नाहीत. मागेच व्हायरल झालेल्या व्हिडिओत तर एक सिंह देखील कोब्राला पाहून पळ काढत असल्याचे दिसून आले. मात्र आताच व्हिडिओ काहीसा अनोखाच आहे, यातील कुत्र्याची दहशत पाहून तुमच्या अंगावर काटाच येईल. नक्की काय आणि कसं घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
काही वेळातच रॉटवेलरने न घाबरता किंग कोब्रावर हल्ला केला आणि काही क्षणातच त्याचे दोन तुकडे केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ते पाहून लोक अवाक् झाले आहेत. Rottweiler हा जगातील सर्वात शक्तिशाली आणि आक्रमक कुत्र्यांपैकी एक मानला जातो. सर्वात विषारी सापांमध्ये किंग कोब्राची गणना केली जाते. दोघांमधील या लढतीने लोकांची मने हादरली. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एका घराबाहेरचे दृश्ये दिसून येते. इथे तुम्हाला एक काळा कुत्रा दिसेल. यावेळी त्याला बागेत एक किंग कोब्रा फणा काढून उभा असल्याचे दिसते. त्याला पाहतच कुत्रा पिसाळतो आणि त्याला तोंडात पकडत अक्षरशः चावून चावून त्याचे तुकडे करतो, हे सर्वच दृश्य फार भयाण वाटते. लोक हे दृश्य पाहून थक्क झाले असून वेगाने आता हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @lone_wolf_warrior27 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखाहून अधिकचे व्युज मिळाले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “एखाद्या दिवशी हा कुत्रा पोलंडवर आक्रमण करू शकतो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो ठीक आहे ना…?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.