भूक लागली तर चिमुकल्या गजराजाने फळविक्रेत्याकडे केली चोरी, गोंडस दृश्ये पाहून तुमच्याही चेहऱ्यावर उमलेलं हसू; क्यूट Video Viral
तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर इथे बरेच व्हिडिओ व्हायरल होताना तुम्ही पाहिले असतील. अनेक विचित्र गोष्टी, स्टंट्स, जुगाड इथे शेअर केले जातात आणि ते व्हायरल देखील होतात. इथे बऱ्याचदा प्राण्यांच्या जीवनातीलही अनेक मजेदार गोष्टी शेअर केल्या जातात , ज्यांना लोक फार आवडीने पाहतात आणि म्हणूनच कमी वेळात असे व्हिडिओ व्हायरल होतात. आताही इथे असेच काहीसे घडले आहे, इंटरनेटवर एका चिमुकल्या गाजराजाचा व्हिडिओ सध्या फार ट्रेंड करत आहे. यात तो एका फळविक्रेत्याकडे चोरी करताना आढळून आला. मात्र आमच्यावर विश्वास ठेवा, इतकी क्युट आणि गोंडस चोरी तुम्ही आजवर कधी पाहिली नसेल. याचा व्हिडिओ शेअर होताच यातील मनमोहक दृश्यांनी लोक भारावून गेले आहेत. चला नक्की व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात हत्तीचा एक संघ रस्त्यावर जात असतो आणि यातच शेवटी एक गोंडस चिमुकला हत्तीही असतो. रस्त्याला लागूनच एक फळविक्रेता फळे विकत असतो. अशातच चिमुकल्या हत्तीची नजर त्या फळांकडे जाते आणि त्याला ती फळे खाण्याचा मोह काही आवरता येत नाही. हत्ती लगोलग त्या फळांच्या गाडीकडे जातो आणि गुपचूप त्यातून एक फळ उचलू पाहतो. फळविक्रेता त्याला हेटीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही. करताना पाहतो आणि मोठ्या मानाने त्याला स्वतःहून फळ काढून खायला देतो. चिमुकला हत्ती लगेच खुश होतो आणि आपल्या सोंडेने ते फळ पकडत त्याचा आस्वाद घेत तेथून निघून जातो. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून चमुकल्या हत्तीचे हे कृत्य आता सर्वांना खुश करत आहे.
A quick snacks break for Chotu. Cute💕 pic.twitter.com/euuOjJkzN8
— Susanta Nanda IFS (Retd) (@susantananda3) June 23, 2025
Technologia! नळातून पाणी पिण्यासाठी महिलेने लढवली अशी शक्कल पाहून म्हणाल…; VIDEO तुफान व्हायरल
चिमुकल्या गाजराजाचा हा व्हिडिओ @susantananda3 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “विक्रेताही माणुसकीचा होता” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप क्युट आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला हे आवडले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.