Technologia! नळातून पाणी पिण्यासाठी महिलेने लढवली अशी शक्कल पाहून म्हणाल... ; VIDEO तुफान व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Viral News Marathi : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी स्टंट, कधी जुगाड असे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिवाय काही असेही व्हिडिओ पाहायला मिळतात की हूस आवरणे कठीण होऊन जाते. अलीकडे नव्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे अनेक छोट्या छोट्या गोष्टींमध्येही बदल झाले आहेत. मात्र काही लोकांना यामुळे अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो. आता पाणी पिण्याच्या नळामध्येही बदल झाला आहे. ज्या नळाला आधी केवळ गोल फिरवल्यामुळे पाणी येते होते आता यामध्येही अनेक नवीन तंत्रज्ञान आले आहे. सध्या असाच काहीसा प्रकार या महिलेसोबत घडला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभी आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर पाणी पिण्याच्या टाकीजवळ ती उभी आहे. या टाकीला असलेला नळ ती दाबून पाणी पिण्याचा प्रयत्न करते. परंतु एकदा नळ प्रेस करुन सोडल्यावर थोडे पाणी येते आणि बंद होते. असे महिला दोन तीन वेळा करते परंतु तरीही तिला पाणी पिण्यास मिळत नाही. कदाचित तिच्या लक्षात आले नसेल की तिला एका हाताने नळ प्रेस करुन ठेवावा लागेल आणि पाणी प्यावे लागले. पण ती यासाठी एक वेगळीच शक्कल लढवते. वैतागून महिला पाण्याचा नळ डोक्याने प्रेस करुन ठेवते. मग नळातून पाणी आल्यावर आपली तहान भागवते. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
टैलेंट तो कूट कूट कर भरा है…..😁😁 pic.twitter.com/Oz6W6QBtlA
— Meenakshi Singh (@Meenaks06356943) June 25, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Meenaks06356943 मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. यावर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये महिलेमध्ये टॅलेंट कुटून कुटून भरला आहे असे म्हटले आहे. एका युजरने काय होते हे असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने बरोबर आयडिला लावली तिने असे म्हटले आहे. आणखी एका युजरने डोके टेकवून वापरले असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.