बेंगळुरूच्या रस्त्यावर 'लॅम्बोर्गिनी'चा थरार! भररस्त्यात जीवघेणी स्टंटबाजी, पोलिसांनी उतरवली मस्ती, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आता हे च पहाना बेंगळुरुच्या रस्त्यावर एका लॅम्बोर्गिनी वाल्याने धोकादायक स्टंट केला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. धक्कादायक म्हणजे अशा स्टंटबाजीच्या व्हिडिओंना लाईक्स आणि व्ह्यूज मिळाल्याने यांचे धाडस वाढतच आहे. लोक अशा घटनांवर केवळ संताप व्यक्त करतात. जर अशा व्हिडिओंना लाईक्स, कमेंट, व्ह्यूज येणे बंद झाले तर नक्कीच असे प्रकार बंद होती. मात्र हे काही होईल याची शक्यता जरा कमीच आहे. मात्र या लॅम्बोर्गिनीवाल्यांना कायद्याने चांगलाच झटका दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी २१ मार्च २०२६ च्या पहाटे शहरातील वर्दळीच्या ठिकाणी लॅम्बोर्गिनीवाला थरारक स्टंट करत होता. अनिल कुंबळे सर्कल या बर्दळीच्या रोडवर या तरुणाची स्टंटबाजी सुरु होती. यावेळी रस्त्यावरुन इतर वाहने ये-जा करत होती. कारणमधील तरुणाने बाहेर येऊन आराडा-ओरडही केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच मात्र पोलिसांनी तरुणाचा माज उतरवला आहे. ट्रॅफिक पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत. संबंधित कार चालकाचे लायसन्स जप्त केले आहे. तसेच त्याला दंडही ठोठवला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे. अशा श्रीमंत लोकांना घरात ठेवा, रस्त्यांवर येऊन सामान्यांचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकारा यांना नाही असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
व्हायरल व्हिडिओ
Video from last night in Bengaluru. Lamborghini KA 05 NR 0009 seen repeatedly doing donuts at a public junction under a flyover while other vehicles were present, posing a safety risk.@blrcitytraffic @BlrCityPolice please look into this and take action if required. pic.twitter.com/UuOHXljE5i — CitizenReportIN (@CitizenReprt) March 21, 2026
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






