ऑफिसहून थकून आलेल्या बाबांचे मुलाने केल खास अंदाजात स्वागत; पुढं जे घडलं पाहून डोळे पाणावतील, VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सहसा बाप-लेकाचं नातं थोडं अबोल आणि संकोचपूर्ण असते. अनेकदा वडिलांना आपल्या मुलावरचं प्रेम शब्दांत व्यक्त करता येत नाही. ते मुलाला रागवतात, शिस्त लावतात, पण त्या मागे अपार जिव्हाळा दडलेला असतो. मुलांनाही वडिलांचा धाक असल्यामुळे भावना मोकळेपणाने सांगताना थोडी भीती वाटते. पण आजकाल हे चित्र बदलताना दिसत आहे. आता बाप-लेक एकमेकांशी अधिक मोकळेपणाने आपल्या प्रेम वेगवेगळ्या, खास आणि भावूक पद्धतीने व्यक्त करताना दिसत आहेत.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ असाच काहीसा आहे. ऑफिसवरुन थकून आलेल्या आपल्या वडिलां मुलाने एक खास अंदाजात स्वागत केले आहे. त्यांचा थकवा निघून जाण्यासाठी भन्नाट असा गाणे लावून डान्स केला आहे. यामागचे त्याचे वडिलांवरचे प्रेम दडलेले आहे. तसेच वडिलांनी आल्यावर जे केलं पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहे. व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एक मुलागा आपल्या वडिलांची आतुरतेने वाट पाहात आहे. दरवाजाजवळ उभा असून वडिल आत येताच गाणे लावून डान्स करत त्यांचे स्वागत करतो. यावर वडिल सुरुवातील गंभीरपणे त्याच्याकडे बघत असतात. जणू आता त्याला मारच पडणार असे वाटते, पण याउलट वडिलही अचानक मुलासोबत डान्स करु लागतात. ज्यामुळे वातावरण आनंदमयी होऊन जाते.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @ghantaa या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी यावर हार्टचे इमोजी शेअर केले आहे. एका नेटकऱ्याने बापू के साथ वाईब्स मॅच हो गई असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने आजचा हा सर्वात सुंदर व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस पडत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






