Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शॉर्टकटने घेतला जीव! रेल्वे ट्रॅक ओलांडताना भाचीसह मावशीचा ट्रेनखाली चिरडून मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

Railway Accident Video : बिहारच्या बख्तियारपूर रेल्वे स्टेशनवर भीषण अपघात घडला ज्यात भाची आणि मावशीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेल्वे रुळ ओलांडताना भरधाव ट्रेनने असे चिरडले की दोघींच्या शरीराचे तुकडे झाले.

  • By नुपूर भगत
Updated On: May 07, 2026 | 09:35 AM
शॉर्टकटने घेतला जीव! रेल्वे ट्रॅक ओलांडताना भाचीसह मावशीचा ट्रेनखाली चिरडून मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

शॉर्टकटने घेतला जीव! रेल्वे ट्रॅक ओलांडताना भाचीसह मावशीचा ट्रेनखाली चिरडून मृत्यू; घटनेचा थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे रुळ ओलांडताना भरधाव ट्रेनची धडक; दोन महिलांचा जागीच मृत्यू
  • बख्तियारपूर स्टेशनवरील भीषण अपघाताचे CCTV फुटेज व्हायरल
  • नियमांकडे दुर्लक्ष जीवावर बेतलं; प्लॅटफॉर्मवर चढताना घडली दुर्घटना
आजकाल कधी कुणाचा आणि कसा मृत्यू होईल ते सांगता येत नाही. रेल्वे अपघातांमध्ये दिवसेंदिवस वेगाने वाढ होत असून अलिकडे अशाच एका घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. घटना बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील बख्तियारपूर रेल्वे स्थानकावर घडून आली. रेल्वे रुळ ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वेने दोन महिलांना धडक दिली आणि यात चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेमुळे स्टेशन परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले तर याचे सीसीटीव्ही फुटेज आता इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओतील दृष्ये नक्कीच कुणालाही हादरवून टाकणारी आहेत.

ट्रेन पण स्वतःचीच आणि रेल्वे रूळही… भारतातील एक असा व्यक्ती ज्याच्याकडे होते 113 कोटींचे स्वतःचे रेल्वे स्टेशन

काय घडलं व्हिडिओत?

रेल्वे ट्रॅकवरुन जाण्यास खरंतर धोका हा असतोच. नागरिकांना वेळोवेळी ट्रॅकवर न जाण्याची विनंती केली जाते पण बऱ्याचदा या गोष्टीकडे दुर्लक्ष करत फक्त काही शुल्लक वेळ वाचवण्यासाठी लोक जीवाचा धोका पत्कारतात. व्हिडिओतही भाची आणि तिची मावशी रेल्वे रुळावर उतरुन प्लॅटफाॅर्मवर चढण्याचा प्रयत्न करताना दिसले पण यात त्यांना काळाने साथ दिली नाही. व्हिडिओमध्ये दिसते की, रेल्वे रुळ ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेनने दोन्ही महिलांना वाईटरित्या चिरडले ज्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघाताचे सासीटीव्ही फुटेज आता सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे. अपघाताच्या या दृष्यांनी सर्वांनाच हादरवलं ज्यामुळे काही वेळातच व्हिडिओ इंटरनेटवर शेअर होऊ लागला.

हातात वरमाला घेऊन तयार होता वर, वधूने उडी मारत भरमांडवातून काढला पळ, लग्नसमारंभातील Video Viral

मिळालेल्या माहितीनुसार, बख्तियारपूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ जवळ हा अपघात झाला, जेव्हा दोन महिला परवानगीशिवाय रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करत होत्या. डाउन लाईनवर भरधाव वेगाने येणाऱ्या न्यू फरक्का एक्सप्रेसने त्यांना धडक दिली. ट्रेनचा वेग इतका जास्त होता की त्या महिलांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. धडक इतकी जोरदार होती की दोघांच्याही शरीराचे तुकडे झाले. जीआरपीने मृतदेह शवविच्छेदनासाठी उपविभागीय रुग्णालयात पाठवला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्या महिला कुठून येत होत्या आणि रेल्वे रुळ का ओलांडत होत्या, याचा ते शोध घेत आहेत. या अपघातामुळे स्टेशनच्या कामकाजात थोड्या काळासाठी अंशतः व्यत्यय आला होता, जो नंतर पूर्ववत करण्यात आला.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Bihar bakhtiyarpur station train accident two women killed while crossing railway track cctv footage viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral
1

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
2

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral
4

‘सुप्रीम कोर्ट’ थीमवर गणपतीचा अनोखा दरबार; ‘न्यायमूर्ती गणराया’ देत आहेत दर्शन, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.