पैसा दे बॉयफ्रेंड ले! फ्रेंड झोनपासून ते डेटिंगपर्यंतचे सर्व ऑप्शन्स उपलब्ध, मुलींनो हा Viral Video एकदा पहाच
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात कधी भावूक करतात तर कधी आपल्याला थक्क करून सोडतात. इथे बऱ्याचदा काही भीतीदायक आणि थरारक व्हिडिओ देखील शेअर होतात जे पाहून आपला आपल्या अंगावर काटा येईल. सध्या मात्र इथे एक अजब-गजब व्हिडिओ व्हायरल झाला आहे. खास करून तरुण मुलींमध्ये हा व्हिडिओ वेगाने धुमाकूळ माजवत आहेत. यातील मजकूर तुम्हाला थक्क देखील करू शकतो. नक्की यात काय आहे ते जाणून घेऊयात.
तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की आता लवकरच काही दिवसांनी तरुण मुला-मुलींचा आवडीचा दिवस व्हॅलेंटाइन डे येणार आहे. या प्रेमाच्या दिवशी अनेक कपल्स एकत्र मोकळा वेळ घालवतात आणि या दिवसांची मजा लुटतात. मात्र हा दिवस सेलिब्रेट करण्यासाठी आपल्याकडे एक पार्टनर असणे फार गरजेचे आहे. अशात काही सिंगल मुलींसाठी एक खास जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही जाहिरात आता तरुण मुलींमध्ये खूप लोकप्रिय होत असून यातील मजकूर आता अनेकांच्या पायाखालची जमीन हादरवत आहे. तुम्ही आजवर भाजी अथवा कोणतीही कामाची वस्तू विक्रीसाठी असल्याचे पाहिले असेल मात्र बॉयफ्रेंड भाड्याने मिळत असल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? होय, आश्चर्यकारक वाटणारी ही गोष्ट आता सत्यात घडत आहे. चला सविस्तर याविषयी जाणून घेऊयात.
एका दिवसासाठी मला भाड्याने घ्या –
फ्रेंड झोन (The Friend Zone) – ₹ 2000
द वी डेटिंग (The We Dating) – ₹4000 (चॉकलेटसह)
द रोमँटिक डिनर (The Romantic Dinner)- ₹ 2500 (फेसबुक/इंस्टा साठी फोटोसह)
तुमच्या पालकांसह रात्रीचे जेवण (The Dinner your Parent) – ₹ 2600 (जर मला लहान भावंडांसोबत खेळायचे असेल तर 8000)
द लव्ह बर्ड्स (The Love Birds) – ₹9000 (हात पकडणे + बाईक चालवणे समाविष्ट आहे)
ओएमजी ते डेटिंग करत आहेत (The OMG They are Dating): ₹30,000 (आपण आजपासून डेटिंग सुरू करू, फेसबुकसाठी अल्बम, मित्र/कुटुंबियांसमोर हात धरणे इन्क्लुड)
फेसबुकवर रिलेशनशिप स्टेटस डेटिंग करत अपडेट करा (Update Relationship Status on Facebook to Dating): लक्षात ठेवा की तुम्ही ते 2 आठवडे ठेवू शकतो
इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर आता जोरदार धुमाकूळ घालत आहे. मुलीचं काय तर मुलंही याला पाहून शॉक झाले आहेत. हा व्हिडिओ @allensthetics नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी यावर आपल्या कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी तुला आयुष्यभर भाड्याने घेऊ शकते, तुला कायमचे ठेवू शकते आणि तुझी बिल्स देखील प्रेमाने भरली जातील” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावा तू खूप महाग आहेस”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.