(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर अनेकदा बऱ्याच निरनिराळ्या गोष्टी व्हायरल होत असतात. या गोष्टी कधी आपल्याला हसवतात कधी भावुक करतात तर कधी थक्क करून सोडतात. दररोज सोशल मीडियावर हजारो व्हिडिओज व्हायरल होत असतात. आता देखील इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यातील दृश्ये तुम्हाला पोट धरून हसवतील. यात काकांची कशी फजिती होते ते दिसून आले आहे. व्हिडिओत नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊयात.
सध्या सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो काकाशी संबंधित आहे. यामध्ये एक काका आपल्या एका काकूंना इम्प्रेस करताना दिसून आले. मात्र त्यांचा हा प्रयत्न सपशेल फेल ठरतो आणि त्यांची ही फजिती हास्याचे कारण बनते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की लोक लाकडी पुलावरून जात आहेत, ज्याच्या खाली पाणी वाहत आहे. यावेळी अचानक काकूंचे मुल मस्ती करत करत पाण्यात पडते. यानंतर काकू घाबरतात आणि ते पाहून शेजारी उभे असलेले काका लगेच मदतीसाठी पाण्यात उडी मारतात. त्याच्या धाडसी पाऊलाने काकू प्रभावित होतील असे त्यांना वाटते. पण काहीतरी भलतेच घडते ज्याने सर्वच थक्क होतात.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल की काकांनी पाण्यात उडी मारताच काकूंनी बाजूने मुलाचा हाथ पकडला आणि त्याला पाण्यातून वर खेचत बाहेर काढले. काकूंनी आनंदाने मुलाला सुखरूप पाहिलं आणि त्या पुढे निघून गेल्या. काकांचे मात्र पाण्यात उडी मारणे व्यर्थ ठरते आणि पाण्यात उभे राहून हा सर्व प्रकार गप्प राहून पाहत राहतात. काकूंनी मात्र काकांकडे एकदाही पाहिले नाही. ती तिच्या आनंदात मग्न होती आणि तिने काकांकडे लक्ष दिले नाही. काकांना कोणी मदत केली नाही आणि त्यांना स्वतः बाहेर जावे लागले. हे दृश्य एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखे होते आणि संपूर्ण परिस्थिती खूपच हास्यास्पद बनते. एकाह व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल असून लोक आता काकांच्या या फजितीची मजा घेत आहेत.
काकांचा हा व्हायरल व्हिडिओ @viral_ka_tadka नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘काकांसोबत मोये मोये झाले’. व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत असून लोक आता यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओने हे सिद्ध केले आहे की काहीवेळा विचार न करता केलेली चांगली कृत्ये देखील उलटू शकतात आणि कधी कधी अपेक्षाही धुळीला मिळतात.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.