सरकार जेवू घालीना-पदवी भिक मागू देईना! इंटरव्ह्यूसाठी रस्त्यावर लागली एक किलोमीटरची रांग, बेरोजगारीचे विदारक दृश्य; Video Viral
सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवगेळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ अनेकदा आपल्याला थक्क करतात. यात बऱ्याच अशा काही घटना दाखवल्या जातात ज्या पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल. सध्या देखील इथे असेच काहीसे घडल्याचे दिसून येत आहे. या व्हायरल व्हिडिओतील दृश्ये तुमच्या अंगावर काटा आणतील. यात नक्की काय घडले ते आपण सविस्तर जाणून घेऊयात.
आपणा सर्वांना हे ठाऊक आहे की, सध्या देशात बेरोजगारीचे प्रमाण फार वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातील मगरपट्टा भागातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात देशातील बेरोजगारीचे भयाण दृश्य दिसून आले. माहितीनुसार, तेथील एका नामांकित आयटी कंपनीने वॉक-इन इंटरव्ह्यू ठेवला होता, ज्यासाठी नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने तरुणांनी रस्त्यावर सुमारे एक किलोमीटर लांबीची रंग लावल्याचे दिसून आले. मुलाखतीसाठी तब्बल 3000 कँडिडेट्स यावेळी इथे उपस्थित होते. नोकरी मिळेल या आशेने राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नाही, तर देशभरातून बेरोजगारांनी गर्दी केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान बेरोजगारीचे हे विदारक दृश्ये पाहून आता सोशल मीडियावर युजर्स हैराण झाले आहेत. व्हिडिओत दिसत असलेली तरुणांची लांबलचक रांग, कडक उन्हात उन्हात उभे असलेले चिंताग्रस्त इंजिनिअर आणि आयटी एका नोकरीसाठी लोकांच्या नजरेतून आशा सर्वकाही सांगून जाते. शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात सध्या आयटी हब सुरु होत आहे ज्यामुळे आयटी कंपनीने थेट मुलाखती ठेवली होत्या. फक्त 200 जागांसाठी कंपनीने मुलाखत ठेवली होती असा दावा सोशल मीडियावर केला जातोय. मात्र त्यासाठी तब्बल 3000 इंजिनिअर तरुण तरुणींनी रस्त्यावर पाहायला मिळाली.
पुणे ,महाराष्ट्र
IT कंपनी ने 200 पदों पर नियुक्ति के लिए इश्तहार दिया
हजारों इंजीनियर कंपनी के बाहर लाइन लगाकर खड़े हो गए
न्यू इंडिया में नौकरियां की भी जरूरत है 🇮🇳 pic.twitter.com/kerP9jdPOQ
— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 (@atullondhe) January 26, 2025
याचा व्हिडिओ @atullondhe नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘आयटी कंपनीने 200 जागांसाठी जाहिरात दिली असता हजारो अभियंते कंपनीबाहेर रांगेत उभे होते, न्यू इंडियामध्ये नोकऱ्यांचीही गरज आहे’ असे लिहिले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अभियंता पदवी मिळवण्यासाठी 10 ते 15 लाख रुपये खर्च होतात, या बदल्यात सरकार त्यांना काय देते बेरोजगारी आणि मृत्यू?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.