क्षणातच हवेचा फुगा आगीच्या गोळ्यात बदलला; अंगाची झाली राख अन् घटनेत तब्बल ८ जणांचा मृत्यू; थरारक Video Viral
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात जे आपल्या आश्चर्याचा धक्का देतात. आता मात्र इथे एक दुर्दैवी घटना व्हायरल झाली आहे जिने सर्वांचेच हृदय पिळवटून टाकले आहे. प्रत्येकाला मृत्यू हा अटळ आहे मात्र कोणतीही कल्पना नसताना अचानक मृत्यूला बळी पडणे आणि तेही तडफून तडफून मरणे हे जरा भीषण आहे. आता विचार करा तुम्ही तुमच्या जीवनातून थोडा वेळ काढत मजामस्ती करायला गेलात आणि हीच मजामस्ती तुमचा काळ बनून तुमच्यावर वार करतेय हे समजताच तुमची प्रतिक्रिया काय असेल… सध्या अशीच एक घटना ब्राझीलच्या सांता कॅटरिना राज्यात घडून आली आहे. याचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. एका क्षणातच ८ जणांचे शरीर जळून खाक झाले आणि व्हिडिओतील हे दृश्य तुमच्या अंगावर काटा येईल. चला यात घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
ब्राझीलच्या सांता कॅटरिना राज्यात एक दुर्दैवी अपघात घडला. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ब्राझीलच्या सांता कॅटरिना राज्यातील प्रेया ग्रांडे शहरात हा अपघात घडला. आकाशात उडणाऱ्या एका हॉट एअर बलूनला अचानक आग लागली, ज्यांनंतर संपूर्ण अवकाशात आगीचे भयाण दृश्य दिसून आले. या आगीत जळून तब्बल ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आणि २ जणांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
शनिवारी सकाळी प्रेया ग्रांडे येथे एका गरम हवेच्या फुग्याने २१ जणांना घेऊन उड्डाण केले. जमिनीपासून काही उंचीवर पोहोचताच फुग्यातून एक ठिणगी निघाली आणि त्याला आग लागली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये, गरम हवेचा फुगा हवेत आगीच्या गोळ्यात कसा बदलतो हे स्पष्टपणे दिसून येते. यानंतर, फुग्यातील सर्व लोक एक-एक करून खाली पडतात आणि फुगा देखील राखेच्या स्वरूपात खाली येतो. अग्निशमन विभागाच्या माहितीनुसार, या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी २ जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Moment burning hot air balloon PLUMMETS to ground
Terrifying footage of tragedy in southern Brazil
Officials say at least 8 dead and 2 SURVIVORS pic.twitter.com/Q2bC3qZNWW
— RT (@RT_com) June 21, 2025
भररस्त्यात नागरिकाने ऑन ड्युटी पोलिसांवर उचलला हात; सटासट चापटा मारल्या अन् पाहून सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का; Video Viral
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @RT_com नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पाहा आगीत जळण्याऐवजी दोन लोकांनी स्वतःला वाचवण्यासाठी उडी मारली’ तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते वाचले कसे काय” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “स्वतःसाठी टीप: कधीही बलून राईड करू नये”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.