
meerut mahila constable viral video
या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळून महिला कॉन्स्टेबल विरोधात कारवाईची मागणी केली जात होती. या घटनेनंतर महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले होते. दरम्यान या घटनेला आता एक नवे वळण आहे. महिला कॉन्स्टेबलने धक्कादायक खुलासा केला आहे. एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत महिला कॉन्स्टेबल रचना राठीने या घटनेबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, त्या
त्या त्यांच्या ७५ वर्षीय आजीला घेऊन डॉक्टरकडे निघाल्या होत्या. यावेळ एका गाडीने त्यांचा रास्ता चुकीच्या मार्गाने रोखला. रचान यांनी आरोप केला की, त्या माणसाने गाडीतून उतरताना तिच्या छातीला स्पर्श केला. तसेच तिलाही शिवीगाळ केली. यामुळे संतापून त्यांनी त्या व्यक्तीला अपशब्द बोलले. तुरुगांता टाकण्याची धमकी दिली. याबाबत रचान राठी यांनी माफी देखील मागितली आहे. तसेच त्यांनीहेही स्पष्ट केले की या घटनेवेळी त्या गणवेशात नव्हत्या त्यांनी केवळ लोअर्स आणि जॅकेट घातले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रचान राठी यांना रोखणारा व्यक्ती अलीगढहून मुझफ्फरनगरला निघाला होता. त्याच्या I20 कारवर आधीच १४ चलने आहेत. ज्यांचे मूल्य एकूण ४३,७८२ आहे. रचना राठी यांच्यावर त्यांच्या गैरवर्तानामुळे सोशल मीडियावर तीव्र टीका करण्यात आली होती. त्यांनी म्हटले की, एखाद्या महिलेचा, मुलीचा लैंगिक छळ झाला, तिच्याशी गैरवर्तनाचा प्रकार घडला तर या मुद्दा उठवून तिलाच टीकांचा सामना करावा लागतो. पण एखाद्या महिलेने तिच्यासोबतच्या गैरवर्तनाला उत्तर दिले तर तिच्या नोकरीवर, चारित्र्यावर टीका केली जाते.
“मुंह में म्यूट दूंगी अभी…ये बोल यूपी पुलिस की महिला सब इंस्पेक्टर के हैं..! सामने वाला बेचारा युवक शालीनता से बात करते हुए सफाई दे रहा है…लेकिन मैडम सर पर बैठना चाहती है…! शुक्र है बेचारा युवक मैडम के तिलस्मी कहर से बच गया नहीं तो पता न क्या होता..! 📍मेरठ (यूपी) pic.twitter.com/SvDYaYMSnr — Rahul Saini (@JtrahulSaini) December 29, 2025
वर्दीचा माज! वाहतूक कोडींत महिला दरोगाची अरेरावी; मेरठमधील व्हायरल व्हिडिओने खळबळ