(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर हाणामारीची एक नवीन घटना वेगाने व्हायरल होत आहे. मात्र यावेळी हाणामारीचे हे दृश्य सामान्य नसून यात व्यक्तीने चक्क पोलिसांवरच हातच उचलल्याचे दृश्ये दिसून आले. रस्त्यावर वाहतूक कोंडी सुरु असताना ही घटना घडून आली. ट्रॅफिक पोलीस आणि नागरिकाच्या मारामारीचा हा व्हिडिओ आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. घटना कल्याण-शहाड रोडवर वाहतूक कोंडीदरम्यान घडून आली. मयूर काणे असे या तरुणाचे नाव आहे, जो चुकीच्या बाजूने त्याची दुचाकी चालवत होता. चला नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
ड्युटीवर असलेल्या एका वाहतूक पोलिसाने नियम मोडणाऱ्या एका तरुणाला थांबवले आणि इथूनच सर्व ड्रामा सुरु झाला. ट्रॅफिक पोलिसांनी थांबवताच तरुण संतापला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला ज्याचे रूपांतर लवकरच हाणामारीत झाले. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मयूर केणे पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर धरून त्याला शिवीगाळ करताना दिसत आहे.व्हिडिओच्या सुरुवातीला, तो तरुण पोलिसाच्या शर्टचा कॉलर घट्ट धरून ठेवताना दिसतो , ज्यामुळे पोलिस रागावतो आणि त्याला थप्पड मारतो. त्या बदल्यात, तो तरुणही लगेच पोलिसाला थप्पड मारतो. यानंतर, पोलिस त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो तरुण आक्रमकपणे प्रतिसाद देतो आणि परिस्थिती आणखीनच नियंत्रणाबाहेर जाते.
काही क्षणातच दुसरा वाहतूक पोलिस तिथे पोहोचतो आणि तो त्याच्या सहकाऱ्याला मदत करतो. तरीही, त्या तरुणाचा राग शांत होत नाही आणि तो पोलिसांवर हल्ला करत राहतो. घटनेवेळी आजूबाजूला इतर लोकही उपस्थित असतात मात्र कुणाचाही या वादामध्ये येण्याची हिम्मत नाही. सर्व जमाव प्रेक्षक बनून हे दृश्य उघड्या डोळ्यांनी बघत बसतात. सोशल मीडियावर मात्र आता या घटनेच्या मिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. काहीजण व्यक्तीला दोषी ठरवत आहेत तर पोलिसही अनेकदा नियमांचे उल्लंघन करतात असे काहींचे म्हणणे आहे. दरम्यान हा व्हिडिओ @kalyan_dombivli_express नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.