
buffalo attack on woman terrific video goes viral
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, एक महिला म्हशीला घेऊन गल्लीतून निघालेली आहे. याच वेळी महिला म्हशीच्या पुढे जाते. अचानक म्हैस उधळते आणि तिच्यावर शिंगांनी हल्ला करते. यामुळे महिला हवेत उडते आणि गोल फिरुन जमिनीवर दाणकन आदळते. महिला इतक्या जोरता जमिनीवर आदळते की खाली पडल्यावर ती बेशुद्ध किंवा मेल्यासारखी वाटते. पण म्हैश तिच्या जवळ जाताच ती गोल फिरते. याच वेळी दोन तरुण गाडीवरुन जात असताताना ही घटना पाहतात. दोघेही महिलेला उठण्यास मदत करतात. पण यानंतर महिलेसोबत नेमकं काय घडलं, तिला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही ना याची माहिती मिळालेली नाही. पण म्हशीचा मार इतका भयंकर होता की पाहून कोणचाही थरकाप उडेल.
व्हायरल व्हिडिओ
हादसे हर वक़्त आपका पीछा कर रहे होते हैं 🛑
हमेशा सतर्क रहिए यूपी के झांसी में बबीना का वीडियो. महिला को सांड ने टक्कर मारकर हवा में उछाल दिया. pic.twitter.com/CcMms7HlkI — Ankit Muttrija (@Anku194) September 26, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ @Anku194 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहे. ही घटना उत्तर प्रदेशात घडले असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. अनेकांनी यावर महिलेच्या प्रकृतीबद्दल विचारले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. म्हशीच्या हल्ल्या करण्याचे कारण मात्र समजलेले नाही.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.