ये तो 'गोपी बहू' से भी तेज! पूरी लाटण्यासाठी काकूंनी असा जुगाड केला की...; पाहून हसू आवरणार नाही, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Jugad Viral Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक प्रकरचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. जुगाडाचे तर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही जुगाड तर असे असतात पाहून लोक कौतुक केल्याशिवाय राहणानार नाहीत, तर काही असे जुगाडाचे व्हिडिओ पाहायला मिळतात की हसून हसून पोट दुखून येते. जुगाड करणाऱ्यांच्य मते, यामुळे त्यांचा पैसा आणि वेळ वाचतो. पण काही जुगाड असे असतात की लोकांना काय बोलवे ते सुचत नाही.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिलेने पुऱ्या लाटण्यासाठी असा भन्नाट जुगाड केल्या आहे की, तुम्हाला स्टार प्लस वरच्या सिरिलयल मधील गोपी बहूची आठवण येईल. तसे तर गोपी बहूने लॅपटॉप धुतला होता, पण या काकूंनी लॅपटॉपचा वापर पुऱ्या लाटण्यासाठी केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून अनेकजणांना हसून हसून पोटात दुखू लागले आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @trollscroller या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने गोपी बहू प्रो लेव्हल असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लॅपटॉपचा हा सर्वात योग्य वापर आहे. तिसऱ्या एका युजरने गोपी बहू चे इव्हॉल्युशन झाले असे म्हटले आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
पाकिस्तानात भारतीय संस्कृतीचे दर्शन; नवरात्री उत्सव साजरा करताना दिसले लोक, VIDEO VIRAL
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






