सध्या सोशल मीडियावर नंदीबैलाने दुचाकी स्वाराला दिलेल्या धडकेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये दुचाकी स्वाराचा जीव अगदी थोडक्यात बचावला. चवताळलेल्या बैलाची धडक इतकी जोरदार होती की, तरूण थेट ट्रकखाली गेला आहे. ट्रकचालकाच्या प्रसंगावधानाने दुचाकीस्वाराचा जीव वाचला आहे.
In a bizarre incident, a #bull suddenly attacked a biker, throwing him under a running lorry, but thankfully, the man had a narrow escape as the lorry driver immediately brakes right in time. Salute the alert Driver ❤️.#CCTV #BullAttack pic.twitter.com/hNyiOR5qX5
— Mohd Dastagir Ahmed (@Dastagir_Hyd) April 5, 2024
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण दुचाकीवरुन अगदी व्यवस्थित गाडी चालवत जात आहे. त्याच्या शेजारी एका बाजूला मोठा मालवाहू ट्रक जात आहे. तर दुसऱ्या बाजूला मोठा नंदीबैल घेऊन एक महिला चालली आहे. तेवढ्यात बैल अचानक चवताळतो आणि दुचाकी स्वाराला शिंगाने धडक देतो.
बैलाने हल्ला केल्यानंतर दुचाकीस्वार तरुण गाडीवर पडून थेट ट्रकखाली जातो. मात्र ट्रक चालकाच्या प्रसंगावधानमुळे तो जागीच ट्रक थांबवतो. ट्रक चालकामुळे दुचाकीस्वाराचे प्राण वाचले आहेत.हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ‘यमराज छुट्टी पर थे वर्ना सांड ने तो पूरा काम कर दिया था’ असा कॅमेंट्स या व्हिडिओला येत आहेत.