Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

३ मजली कॅमेऱ्याच्या आकाराचं अनोखं घर! आत राहतं संपूर्ण कुटुंब; मुलांची नावंही ठेवलीयेत Canon, Nikon आणि Epson

Camera Look a like Home : कर्नाटकातील एका कॅमेरा-प्रेमी व्यक्तीने आपल्या घरालाच हुबेहुब कॅमेऱ्याचा आकार दिला आहे. विशेष म्हणजे घराचे इंटिरिअरही फोटोग्राफी थीमवर आधारित असून, गूगल फोटोज-थीम गेस्ट रूम आणि SD कार्डसारखी भिंत अशा अनोख्या डिझाइन्सने ते सजवण्यात आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 07, 2026 | 12:44 PM
३ मजली कॅमेऱ्याच्या आकाराचं अनोखं घर! आत राहतं संपूर्ण कुटुंब; मुलांची नावंही ठेवलीयेत Canon, Nikon आणि Epson

३ मजली कॅमेऱ्याच्या आकाराचं अनोखं घर! आत राहतं संपूर्ण कुटुंब; मुलांची नावंही ठेवलीयेत Canon, Nikon आणि Epson

Follow Us
Follow Us:
  • घराच्या प्रत्येक कोपऱ्यात मालकाच्या आवडीची खास झलक पाहायला मिळते.
  • इंटिरिअरपासून ते कुटुंबातील काही गोष्टींपर्यंत एकच थीम जपण्यात आली आहे.
  • अनोख्या डिझाइनमुळे हे घर परिसरातील लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
आपल्या स्वप्नांच घर सत्यात साकारावं अशी इच्छा तर प्रत्येकाच्या मनात असते. अनेकजण मोठ्या आवडीने आपल्या घराला डिजाईन करतात. कुणाला आपल्या घरात लायब्रेरी हवी असते तर कुणाला होम गार्डन पण कॅमेराच्या आकारात घर बनवल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? स्वप्नवत वाटणारी ही घटना सत्यात घडली असून कर्नाटकात हे अनोखं घर बांधण्यात आलं आहे. एखाद्या वस्तूविषयीचं प्रेम जपण्यासाठी लोक त्या वस्तू जपून, साठवून ठेवतात पण इथे तर एका कुटुंबाने कॅमेरासाठीचे आपले प्रेम दर्शवण्यासाठी संपूर्ण घरालाच हुबेहुब कॅमेरासारखी रचना दिली. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या घराचे नावही ‘Click’ असे ठेवले. हे अनोखे घर आता सोशल मिडियावर व्हायरल होत असून घराची रचना पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये.

वय फक्त एक नंबर! ७० वर्षांच्या आज्जींनी डेड लिफ्ट करत उचलले १०३ किलो वजन, अनोखा स्वॅग पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

कंटेंट क्रिएटर प्रियम सारस्वत याने या घराचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केला असून त्याने घराचा मालका रवि होंगल यांच्यासोबत मिळून घराचा संपूर्ण टूर देखील केला. घरात प्रवेश करताच तुम्हाला एक मोठे कपाट दिसेल, जिथे रवीने आपल्या ३० वर्षांच्या कारकिर्दीत वापरलेले सर्व जुने कॅमेरे आणि लेन्स जपून ठेवले आहेत.

कॅमेराच्या लेन्ससारखी खिडकी

या घराला फक्त बाहेरुनच कॅमेरासारखे तयार करण्यात आले नसून आतूनही याची रचना हुबेहुब कॅमेरासारखी करण्यात आली आहे. घरातील स्वयंपाकघरात एक अशी खिडकी बसवण्यात आली आहे जिला बाहेरुन पाहताच तो कॅमेराचा मोठा लेन्स असल्याचा भास होतो. याशिवाय घरातील बाल्कनीत देखील एक असे रोलींग बसवण्यात आले आहे जे जुन्या काळातील एका फिल्म रोल्ससारखे दिसते. इतकेच नाही तर घरातील प्रत्येक पायऱ्यांवर तुम्हाला कॅमेरा आणि फोटोग्राफीशी निगडीत एक सुंदर मेसेज लिहिल्याचे दिसून येईल. घरातील गेस्ट रुम देखील गूगल फोटोजच्या (Google Photos) थीमवर तयार करण्यात आले आहेत. घरातील भिंतींवरही कॅमेराच्या SD कार्डची डिजाईन तयार करण्यात आली आहे.

मुलांची नावही आहेत कॅमेरांपासून प्रेरित

रवि होंगल यांचे कॅमेराप्रेम इतके आहे की, त्यांनी आपल्या मुलांची नावे देखील कॅमेरांच्या नावांवर ठेवली आहेत. रवीने आपल्या तिन्ही मुलांची नावे जगप्रसिद्ध कॅमेरा आणि प्रिंटर कंपन्यांच्या नावांवरून ठेवली आहेत. त्यांच्या थोरल्या मुलाचे नाव कॅनन , मधल्या मुलाचे नाव निकॉन तर धाकट्या मुलाचे नाव एप्सन असे ठेवण्यात आलंय.

आता हनिमून पाण्यात करावं लागणार…! मगर बनली वधू आणि शहराचा महापाैर झाला वर, अनोख्या लग्नाने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

घराला बनवण्यात आला ७१ लाखांचा खर्च

सांगितले जात आहे की, या अनोख्या घराला तयार करण्यासाठी मालकाला साधारण ७१ लाखांचा खर्च आला. घराची डिजाईन इतकी वेगळी आणि आकर्षित आहे की त्या परिसरातील लोकांसाठी हे घर म्हणजे एक सेल्फी पाॅईंट झाले आहे. इथून जाणारे अनेक लोक जेव्हा या घराला पहिल्यांदा पाहतात तेव्हा त्यांची नजर या घरावरुन हटत नाही. अनेकजण या घराजवळ जाऊन सेल्फी देखील क्लिक करतात. या अनोख्या घराचा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या चांगलाच ट्रेंड करत असून फक्त एका दिवसात याच्या व्हिडिओला करोडोंहून अधिकचे व्हूज मिळाले आहेत.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Camera shaped house karnataka photography theme home goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 12:43 PM

Topics:  

  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
1

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
2

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
4

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.