(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
वय वाढलं की हाड कमजोर होऊ लागतात असं आपण अनेकदा ऐकलं असेल. वयाच्या पन्नाशीनंतर अनेकांना पायऱ्या चालतानाही सांधेदुखीचा भरपूर त्रास होतो. पण व्हायरल व्हिडिओतील आज्जींनी मात्र तरुणांसमोर फिटनेसविषयीची एक नवी प्रेरणा जागवली आहे. आपल्या मनात जिद्द असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीत आपली इच्छा पूर्ण करु शकतो याचे उत्तम उदाहरण आपल्याला या व्हायरल व्हिडिओत पाहायला मिळेल. व्हिडिओमध्ये आपल्याला निळ्या रंगाच्या चुडीदार ड्रेसमध्ये एक आज्जी डेड लिफ्ट करण्याच्या तयारीत असल्याचे दिसतात. जिममध्ये एका आरशासमोर त्या १०३ किलो वजनाचे डेड लिफ्ट बार उचलताना दिसतात. जे वजन उचलताना तरुण मुलांना घाम फुटतो तेच वजन आज्जींनी आपल्या वृद्धवात उचलून दाखवले, जी काही साधी गोष्ट नाही. व्हिडिओत जिममध्ये उपस्थित असलेले काही तरुण देखील आज्जींचा हा पराक्रम पाहून त्यांचे काैतुक करताना दिसतात.
माहितीनुसार व्हिडिओत दिसलेल्या आज्जींचे नाव रोशनी देवी सांगवान असून त्या ‘वेटलिफ्टर मम्मी’ किंवा ‘पॉवरलिफ्टर दादी’ या नावाने ऑनलाइन मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहेत. याच्या साठीच्या उत्तरार्धात वेटलिफ्टिंगचा सराव सुरू करून गंभीर संधिवातावर (आर्थरायटिस) मात केल्यामुळे त्यांना सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता १०३ किलो वजन उचलून त्यांनी तरुणांना पुन्हा एकदा आपल्या फिटनेसने हैराण केलं आहे.
View this post on Instagram
हा व्हिडिओ @weightliftermummy नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘त्या केवळ ७० वर्षांच्या उत्साही महिला आहेत’. अनेक यूजर्स हे दृष्य पाहून संतापले आणि त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यात एका यूजरने म्हटले की, “खरी प्रेरणा”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आई, तुला सलाम. तुझ्यासाठी वय फक्त एक आकडा आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “१०३ किलो? म्हणजे २२७ पाउंड, काहीतरी गडबड आहे, मला वाटतं ती १०३ किलोपेक्षा जास्त वजन उचलत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






