Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढदिवसाचा केक ठरला जीवघेणा! चिमुकल्याच्या पोटात गेल्या लोखंडी तारा; एक्स-रे पाहून पालक हादरले; Video Viral

Birthday Cake Incident : वाढदिवसाचा केक खाल्ला आणि दुसऱ्याच दिवशी मुलाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. याविषयी आईने व्हिडिओ बनवत खाद्यपदार्थांच्या सतर्कतेविषयी लोकांना आवाहन केले आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 10, 2026 | 11:58 AM
वाढदिवसाचा केक ठरला जीवघेणा! चिमुकल्याच्या पोटात गेल्या लोखंडी तारा; एक्स-रे पाहून पालक हादरले; Video Viral

वाढदिवसाचा केक ठरला जीवघेणा! चिमुकल्याच्या पोटात गेल्या लोखंडी तारा; एक्स-रे पाहून पालक हादरले; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर एका चिमुकल्याची प्रकृती अचानक बिघडल्याने कुटुंबीयांची धावपळ उडाली.
  • वैद्यकीय तपासणीत धक्कादायक बाब समोर आली जिने पालकांना हादरवून सोडलं.
  • आपल्यावर ओढावलेल्या या प्रसंगावरुन महिलेने व्हिडिओ बनवत लोकांना आवाहन केले आहे.
वाढदिवसानिमित्त केक कापण्याची आजकाल प्रथाच होऊन बसली आहे. लहान मुलांना हा केक खायला फार आवडतो. सर्वांच्या आवडीचा केक आपल्या जीवासाठी घातक ठरु शकतो असा विचार तुम्ही कधी केला आहे का? अलिकडे सोशल मिडियावर अशीच एक घटना शेअर करण्यात आली आहे ज्यात वाढदिवसाच्या केक मुलाच्या जीवावर बेतल्याचे दिसून आले. स्वत:च्या वाढदिवसाचा केक चिमुकल्याने आवडीने खाल्ला पण दुसऱ्याच दिवशी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयाने पालकांना मुलाचे रिपोर्ट्स दाखवले जे पाहून पालकांना धक्काच बसला. चला घटनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

अगं बाई, ही तर चिखलातली जलपरी! रिलसाठी महिलेने मातीत लोळत केला नागिण डान्स… पाहून यूजर्सने डोक्याला लावला हात; Video Viral

केकमध्ये होत्या लोखंडी तारा…

मुलाचे एक्स-रे रिपोर्ट्स पाहताच आईने एक व्हिडिओ तयार करत ही बाब उघडकीस आणली आणि पालकांना सतर्कतेचा इशारा दिला. तिने सांगितले की, वाढदिवसाच्या दिवशी तिच्या मुलाने नकळत केक खाताना लोखंडी तार गिळली पण प्रश्न असा की ही तार केकमध्ये आलीच कशी. आईने सांगितले की, मुलाच्या वाढदिवसानिमित्त कुटुंबाने ‘बॉलिंग थीम’चा सुंदर केक ऑर्डर केला होता. या केकच्या सजावटीत काही लोखंडी तारांचा वापर करण्यात आला होता ज्याची माहिती बेकर्सकडून कुटुंबाला देण्यात आली नाही.

मुलाची प्रकृती ढासळल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. इथेच एक्स-रे रिपोर्ट्समधून उघड झाले की, मुलाने लोखंडी तार गिळली आहे. यानंतर लगेचच डाॅक्टरांनी मुलावर उपचार करायला सुरुवात केली ज्यात सुदैवाने कोणतीही शस्त्रक्रिया न करता नैसर्गिरित्या मुलाच्या शरीरातून या लोखंडी तारेचे तुकडे बाहेर निघाले. यासाठी सुमारे ४८ तास लागले, ज्यात कुटुंब मुलाच्या आरोग्याला घेऊन प्रचंड घाबरले होते. आपल्या या अनुभवावरुन आईने ,लोकांना आवाहान केले की, केक किंवा सजावटीच्या वस्तू खाण्यायोग्य आहेत की नाही याची आधीच चाैकशी करुन घ्या. अनेकदा केकमध्ये सजावटीसाठी लोखंडी तारा, टूथपिक, प्लास्टीक अशा गोष्टी वापरल्या जातात ज्या आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतात.

15 व्या वर्षी घर सोडलं, 50 वर्षांनंतर भिक्षूच्या रुपात घरी परतला अन् पाहून आईला अश्रू झाले अनावर; हृदयद्रावक घटनेचा Video Viral

महिलेचा हा व्हिडिओ @reyaanshandmama नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून अनेक यूजर्सने याच्या कमेंट सेक्शनमध्ये या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “केक्सवर खूप जास्त रंगीत सजावट करण्याची काय गरज आहे? त्याऐवजी साधेपणा ठेवा आणि काही रंगीबेरंगी फळे (जसे की द्राक्षे) वापरा. ​​दुकानदारांकडून अपेक्षा करण्यापेक्षा आपण स्वतःच आपल्या मुलांची काळजी घेतलेली बरी”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे बापरे… देवाचे आभार की तुझा मुलगा ठीक आहे” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “बापरे! सुदैवाने काही मोठी समस्या उद्भवली नाही. खूपच भीतीदायक होतं ते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Child swallows metal wire from birthday cake parents shocked after xray video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • Birthday
  • Shocking Viral Video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

शाळेत विद्यार्थिनीशी गैरवर्तनाचा आरोप; संतप्त पालकांनी NCC शिक्षकाला चपलांनी केली मारहाण; Video Viral
1

शाळेत विद्यार्थिनीशी गैरवर्तनाचा आरोप; संतप्त पालकांनी NCC शिक्षकाला चपलांनी केली मारहाण; Video Viral

अतिसुंदर! कॅमेऱ्यात कैद झाला दुर्मीळ गुलाबी डॉल्फीन; व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क; Video Viral
2

अतिसुंदर! कॅमेऱ्यात कैद झाला दुर्मीळ गुलाबी डॉल्फीन; व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क; Video Viral

कॉलर पकडली, शर्ट फाडला… मेरठच्या रस्त्यावर पत्नीने पतीची काढली इज्जत; Video Viral
3

कॉलर पकडली, शर्ट फाडला… मेरठच्या रस्त्यावर पत्नीने पतीची काढली इज्जत; Video Viral

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral
4

सीजेपीच्या आंदोलनात श्वानाची वाईल्ड कार्ड एंट्री, विद्यार्थ्यांना पाहताच केला जल्लोष; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.