(फोटो सौजन्य: X)
१५ वर्षांचा असताना घर सोडलेला तिचा चिमुकला मुलगा आता मोठा झाला होता. आपल्या मुलाला इतक्या वर्षांनंतर पाहून तिचा ऊर भरुन आला आणि डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर शेअर करण्यात आला असून यातील दृष्यांनी यूजर्सना भावूक केलं आहे. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
ही घटना उत्तराखंडमधील पिथोरगड येथील आहे. वयाच्या १५ व्या वर्षी येथील एका मुलाने आपल्या घराचा, कुटुंबाचा त्याग करत घर सोडले आणि तो घरी परतला तेव्हा तो ‘बुद्धनाथ’ नावाचा साधु बनला होता. दारोदारी भिक्षेसाठी भटकणाऱ्या या साधुची पाऊले अखेर 50 वर्षांनंतर त्याच्या घरी येऊन पोहचली. आईने जेव्हा त्याला दारात साधुच्या वेशात पाहिले तेव्हा त्याला पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती आपल्या मुलाला पाहून खुश झाली होती. तिचा हा आनंद तिला शब्दात व्यक्त करता येत नव्हता. व्हिडिओमध्ये घराजवळ अन्य काही लोक देखील जमा झाल्याचे दिसते जे आई-मुलाच्या या मिलनाला आपल्या डोळ्यांनी पाहत असतात. यातीलच एकाने या घटनेचा व्हिडिओ आपल्या कॅमेरात कैद केला आणि हे दृष्य सोशल मिडयावर शेअर केले.
A sadhu reunites with his mother after 50 years. He left home at 15 for the ascetic path; she never stopped waiting. A timeless reminder: a mother’s love never fades. ❤️ pic.twitter.com/Rtth39wZbX — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) June 9, 2026
हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘५० वर्षांनंतर एका साधूची आपल्या आईशी पुन्हा भेट झाली. वयाच्या १५ व्या वर्षी संन्यासाचा मार्ग स्वीकारण्यासाठी त्यांनी घर सोडले होते, पण आईने त्यांची वाट पाहणे कधीच थांबवले नाही. एक शाश्वत आठवण: आईचे प्रेम कधीच ओसरत नाही’.
व्हिडिओ पाहून अनेक यूजर्स भावूक झाले असून काहींनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “५० वर्षांची प्रतीक्षा हेच सिद्ध करते की, आईचे हृदय काळाच्या सीमांच्या पूर्णपणे पलीकडे असते”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अगदी आदि शंकराचार्यांनीही आपल्या आईची परवानगी मिळेपर्यंत घर सोडले नाही” आणखी एका यूजरने लिहिले आहे, “आपल्या आईसोबत राहून तिची काळजी घेतली असती, तर त्याचे ते सर्व श्रम वाचले असते. ते खरोखरच दैवी ठरले असते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






