Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाला निघालेत की बाॅर्डरवर युद्ध लढायला? आगीचे रिंगण, पिस्तूलांचा वार, वराच्या एंट्रीवेळी दिसून आला अजब-गजब प्रकार; Video Viral

Shocking Groom Entry Video : बाईईईई हा काय प्रकार! लग्नात वराच्या स्वागतासाठी सज्ज झाले लष्कर. आगीचे रिंगण केले, पाण्यात स्फोट केला अन् व्हिडिओतील दृष्ये पाहाल तर तुम्हीही चक्रावून जाल.

  • By नुपूर भगत
Updated On: May 16, 2026 | 10:28 AM
लग्नाला निघालेत की बाॅर्डरवर युद्ध लढायला? आगीचे रिंगण, पिस्तूलांचा वार, वराच्या एंट्रीवेळी दिसून आला अजब-गजब प्रकार; Video Viral

लग्नाला निघालेत की बाॅर्डरवर युद्ध लढायला? आगीचे रिंगण, पिस्तूलांचा वार, वराच्या एंट्रीवेळी दिसून आला अजब-गजब प्रकार; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • एका लग्नसोहळ्यात वराच्या एंट्रीदरम्यान पाहुण्यांना थक्क करणारे अतरंगी सादरीकरण पाहायला मिळाले.
  • व्हिडिओतील धक्कादायक स्टंट आणि वातावरणामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
  • या अनोख्या एंट्रीवर यूजर्सकडून मजेशीर आणि टीकात्मक प्रतिक्रिया समोर येत आहेत.
मागील काही काळापासून लग्नाचे ट्रेंड इतके बदलले आहेत की यात कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. आपली एंट्री हटके आणि यूनिक करण्यासाठी वर-वधू असं काही करु पाहतात ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का मिळतो. आता सोशल मिडियावर वराच्या अशाच अतरंगी एंट्रीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यातील दृष्ये पाहून तुम्ही नक्कीच गोंधळून जाल. लग्नाच्या मिरवणूकीत हे असे अजब दृष्ये दिसणे पहिलीच वेळ असावी. व्हिडिओमध्ये सर्वच लोक वराची ही एंट्री पाहून थक्क होताना दिसले तर काही आपल्या मोबाईलमध्ये हे अनोखे दृष्य कैद करताना दिसले. चला व्हिडिओत नक्की काय घडून आलं याविषयी जरा सविस्तर जाणून घेऊया.

चालू ट्रेनमध्ये महिलेला सुरु झाल्या प्रसूतीच्या कळा, TTE च्या कामगिरीने जिंकली सर्वांची मने; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, वराचे स्वागत कमांडो स्टाईलमध्ये होताना दिसले. व्हिडिओमध्ये वर शेरवानी घालून गेटवर उभा होता तर काहीजण कमांडोसारखे स्टंट करुन दाखवत होते. त्यांनी काळे कपडे परिधान केले होते आणि आगीचे रिंगण करुन त्यांचे अजबच सादरीकरण दिसून आले. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दिसते की, वर आणि वऱ्हाडी गेटजवळ उभे आहेत तर त्यांच्या समोर लष्करी अंदाजात अनोखे सादरीकरण सादर केले जात आहे.

काळ्या पेहराव्यातील या तरुणांच्या हातात बनावटी पिस्तूल, पेट्रोलची बाटली दिसून आली. एक व्यक्ती पेट्रोल जमिनीवर टाकत आगीचे रिंगण तयार करत होता तर दुसरा पिस्तूलने गोळ्या झाडत होता तर तिसरा मुलगा मध्यभागी ठेवलेल्या पाण्याच्या भांड्यात स्फोट घडवून आणत होता. यासहच बॅकग्राऊंडमध्ये ‘मां तुझे सलाम’ हे देशभक्तीपर गीत वाजवले जात होते. हा सर्वच प्रकार लोकांसाठी आणि पाहणाऱ्या यूजर्ससाठी आश्चर्यकारक ठरला. लग्नात किती भीषण स्वरुपाचे सादरीकरण केले जाऊ शकते याची प्रचिती आपल्याला या व्हिडिओतून घेता येते. घटना नक्की कुठली आहे याची माहिती व्हिडिओत देण्यात आलेली नाही.

शादी में जाना है बारात लेकर बॉर्डर पर नहीं जो ऐसा शो किया जा रहा हैं। pic.twitter.com/Ijccy5iBZd — छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) May 14, 2026

कलेचा अनोखा सन्मान! गुजरातमध्ये कविराजांवर श्रोत्यांनी केला पैशांचा वर्षाव, नोटांचा ढिग पाहून यूजर्स आवाक्; Video Viral

हा व्हिडिओ @ChapraZila नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “पहिल्यांदा पाहिल्यावरच स्पष्ट होतं की हे प्रकरण बिहारशी संबंधित आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “देशात इतकी नाटकी लोक आहेत की विचारही केला जाऊ शकत नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मृत्यू आला तरी चालेल पण स्वत:च्या लग्नात असा फालतूपणा मी चुकूनही करणार नाही”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Commando style wedding entry shocking stunt performance at marriage ceremony shocked everyone viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • funny viral video
  • Video Viral
  • viral news
  • Wedding Video

संबंधित बातम्या

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
1

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
2

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral
3

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral
4

माझं चॉकलेट चोरलं गेलं, मला न्याय हवा… चिमुकल्यांची पोलिसांकडे मिश्किल तक्रार; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.