(फोटो सौजन्य: X)
नक्की काय घडलं?
आपल्या सर्वांना ठाऊक आहे की प्रसूतीच्या वेळी होणाऱ्या वेदना या सहन करण्यापलिकडच्या असतात. याकाळात महिलेला ताबडतोब मदत मिळणे फार गरजेचे असते. याच गोष्टीचे गांभीर्य ओळखून टिकट निरीक्षक आर. एस. तेलीने योग्य ती कारवाई करत महिलेला लगेच मदत पुरवली. ट्रेन क्रमांक 22538 कुशीनगर एक्सप्रेसमध्ये ही घटना घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. यात प्रवास करत असणाऱ्या एका महिलेला अचानक प्रसूतीच्या कळा जाणवू लागल्या. अशात ड्यूटीवर असलेले टिकट निरीक्षक आर. एस. तेली यांनी आपले कर्तव्य बजावत महिलेला रेल्वेच्या सुरक्षित जागी पोहचवले. तिथे रेल्वेच्या नर्स आणि डाॅक्टर पूजा खर्गे यांनी महिलेवर उपचार करत यशस्वीरित्या बाळाला बाहेर काढले.
मुख्य टिकट निरीक्षक की तत्परता से ट्रेन में सुरक्षित प्रसव ट्रेन संख्या 22538 कुशीनगर एक्सप्रेस में ड्यूटी के दौरान मध्य रेलवे भुसावल मंडल के मुख्य टिकट निरीक्षक श्री आर. एस. तेली ने मानवीय संवेदनशीलता एवं तत्परता का परिचय देते हुए गर्भवती महिला यात्री की समय पर सहायता कर… pic.twitter.com/bM6l95VqKa — DRM Bhusaval (@BhusavalDivn) May 13, 2026
महिलेने रेल्वेच्या आतच बाळाला जन्म दिला. यात बाळ आणि महिला दोन्ही सुरक्षित असून महिलेला मुलगी झाल्याचे स्पष्ट होत आहे. घटना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेचे आणि उत्तम सोयीसुविधांचे जिवंत उदाहरण ठरते. दरम्यान सोशल मिडियावर या घटनेची माहिती पोहचताच आता यूजर्स TTE च्या प्रसंगावधानाचे आणि त्याच्या कामाचे चांगलेच काैतुक करत आहेत. या घटनेची व्हायरल पोस्ट @BhusavalDivn नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. यावर अनेक यूजर्सने कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “खरोखरच कौतुकास्पद काम. टीटी फक्त तिकीटच तपासत नाही, तर तो हे सुद्धा करतो. आई आणि बाळ सुखी होवोत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आपला देश खऱ्या अर्थाने बदलत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खूप छान.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






