तरूणाचा रिपोर्टिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ सोशल मीडियावर आपण पाहतो ज्यामुळे आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा मनोरंजक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तुम्ही सोशल मीडियावर रिपोर्टींगचे देखील अनेक व्हिडिओ पाहिले असतील. पण ते व्हिडिओ न्यूज चॅनेलच्या रिपोर्टर्सचे असतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ देखील एका तरूणाचा रिपोर्टिंग करतानाचा आहे.
बिहारच्या पूरगस्त भागात खाद्यपदार्थ वाटप करण्यासाठी गेलेले एक हेलिकॉप्टर कोसळल्यावर एक तरूण त्याचे रिपोर्टिंग करत आहे.सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्स सोशल मीडियावर लिहित आहेत की, बिहारींना सलाम. हा व्हिडिओ बिहारचा असल्याचा दावा आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
गावकऱ्यांनी सैनिकांना वाचवले
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती पुराच्या पाण्यात उभा आहे. पुराचे पाणी त्याच्या गळ्याएवढं आलेले आहे. तो पाण्यात कोसळलेल्या हेलिकॉप्टरसमोर उभा आहे. तो म्हणत आहे, “हे तेच हेलिकॉप्टर बोटीसारखे तरंगत आहे, जे कोसळले आहे. त्यात लष्कराचे जवान आहेत, त्यांना स्थानिक लोकांनी वाचवले आहे. यानंतर रिपोर्टिंग करणाऱ्या तरूणाने हेलिकॉप्टरमधील जवानांना वाचवणाऱ्या तरुणाशी चर्चा केली आहे. तो व्यक्ती एका गावकऱ्याला मिठी मारून म्हणत आहे की तुम्ही केलेले काम खूप चांगले आहे. यावर गावकरी सांगत आहेत की, मीच नाही तर गावातील लोकांनी मिळून त्याला वाचवले आहे. आम्हाला सैनिकांना वाचवण्याची संधी मिळाली याचा आम्हाला खूप आनंद आहे. देव न करो अशी परिस्थिती निर्माण होवो, पण पुन्हा संधी मिळाली तर नक्की वाचवू.
हे देखील वाचा- आहे की नाही क्रिएटीव्हिटी! चक्क बॅटमॅन चालवतोय रिक्षा; व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क
व्हायरल व्हिडिओ
— घातक (@ghatakoperator) October 4, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @ghatakoperator या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, तो व्हिडिओ बनवण्यासाठी पाण्यात गेला आणि नंतर नाटक करत आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, बिहारच्या जनतेने खरोखर मोठे काम केले आहे, लष्कराच्या जवानांना वाचवणाऱ्या बिहारींना सलाम. आणखी एका युजरने म्हटले आहे की, बिहारी लोक भारतातील इतर राज्यांच्या तुलनेत संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी अधिक आदर आणि देशभक्त आहेत. हे माझे वैयक्तिक आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.