फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियाच्या जगात आपल्याला कधी काय पाहायला मिळेल सांंगता येत नाही. अनेकदा आपल्याला असे आश्चर्यकारक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात जे पाहून धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ मनोरंजात्मक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही आत्तापर्यंत सोशल मीडियावर कधी भांडणाचे, तर कधी जुगाडाचे व्हिडिओ पाहिले असतील. लोक असे असे जुगाड करतात की पाहून आश्चर्य वाटते. तसेच अनेक लोक आपली क्रिएटीव्हिटी दाखवतात.
सध्या असाच एक भन्नाट क्रिएटिव्हिटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एका रिक्षावाल्याने आपल्या रिक्षाला भन्नाट क्रिएटीव्ह बनवले आहे की लोक व्हिडिओ पाहून थक्क झाले आहेत. लोकांनी या रिक्षावल्याचे कौतुक केले आहे. या रिक्षावाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रिक्षावाल्याने रिक्षाला बॅटमॅन बनवलेले आहे. आणि त्याची रिक्षा खूप भन्नाट दिसत आहे. याचा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.
बॅटमॅन ऑटो चालवताना दिसला
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याने जात असताना एका व्यक्तीची नजर एका ऑटोवर पडते. ती ऑटो त्याचे लक्ष वेधून घेते. त्याने त्याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे जो सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या सुरुवातीला एक व्यक्ती ऑटो चालवत असल्याचे दिसत आहेत. मात्र समोरून ऑटो पाहताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. वास्तविक त्याने रिक्षाच्या बाहेरच्या कोचेला बॅटमॅनचे पोस्टर लावलेले दिसत आहे. त्याने अशी क्रिएटीव्हीटी दाखवली की समोरून रिक्षा अंधारात पाहिल्यावर बॅटमॅन ऑटो चालवत असल्यासारखा भास होत आहे आणि यामुळे ऑटोचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
Bro’s name is Aura🗿 pic.twitter.com/jtj1NlcF6L
— Phenom (@Phenom962) October 3, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Phenom962 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, भाऊने त्याच्या मेंदूचा पुरेपुर वापर केला आहे. दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, बॅटमॅन जिवंत आहे. तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, बॅटमॅनची भारतीय आवृत्ती. चौध्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ बॅटमॅनचा मोठा चाहता आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.