डिनर डेट? अरे ही तर मृत्यूला भेट...! हजारो फूट उंच अवकाशात दोरीला टेबल लटकवून कपल्सने केला थरारक स्टंट; Video Viral
सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण कधीही गेलो तरी काही ना काही नवं, हटके आणि अतरंगी पाहायला मिळतंच. दररोज लाखो लोक वेगवेगळ्या गोष्टी पोस्ट करत असतात आणि त्यापैकी काही पोस्ट किंवा व्हिडीओ क्षणातच व्हायरल होतात. मात्र, तेच व्हिडीओ वा फोटो लोकांचं लक्ष वेधून घेतात आणि चर्चेत येतात. तुम्हीही जर सोशल मीडियावर रोज थोडा वेळ घालवत असाल, तर नक्कीच तुम्हाला अनेक प्रकारचे व्हायरल व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळाले असतील आणि त्यावर तुम्ही प्रतिक्रिया देखील दिली असेल. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. चला तर मग व्हिडिओत काय घडलं ते सविस्तरपणे जाणून घेऊया.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसलं?
हा व्हिडीओ एका कपलचा आहे जे डिनरसाठी आलेलं दिसतं. ते एका खास दिवशी डिनरला आले आहेत. पण त्यांच्या डिनरच्या ठिकाणामुळे हा व्हिडीओ जोरात व्हायरल होत आहे. लोक हॉटेलमध्ये किंवा घरीच सजावट करून आपल्या पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी डिनर डेट प्लॅन करतात अन व्हिडिओमध्ये कपलने डेटसाठी जे ठिकाण निवडलं ते आता सर्वांनाच अचंबित करून सोडत आहे. सुरुवातीला ते दोघं आपल्या खुर्चीवर बसतात आणि त्या खुर्च्या व टेबल संपूर्णपणे दोऱ्यांनी एका मोठ्या केबलला बांधलेल्या असतात. काही वेळातच हा सगळा सेटअप हवेत उंच अवकाशात लटकवला जातो. आता हवेत लटकून डिनर करण्यासाठी जी हिंमत लागते ती प्रत्येकाकडे नसते. म्हणूनच हा व्हिडीओ लोकांना फारच थरारक आणि वेगळा वाटतो आहे.
First Date ❌ Last Date ✅ pic.twitter.com/oUUZvNINVl
— Diksha 🌸 (@DikshaYrrr) September 3, 2025
हा व्हिडीओ X (ट्विटर) प्लॅटफॉर्मवर @DikshaYrrr नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. पोस्ट करताना कॅप्शन दिलं आहे – “फर्स्ट डेट नाही, लास्ट डेट आहे.” एवढंच नाही तर ही क्लिप लिहिण्याच्या वेळेपर्यंत तब्बल 1.2 मिलियन लोकांनी पाहिली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी मजेशीर आणि गंमतीदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका यूजरने लिहिलं – “हे लोक एवढे वेडेवाकडे आयडिया कुठून आणतात?” तर दुसऱ्याने विचारलं – “हे सगळं कशासाठी? आणखीन एकाने लिहिलं, ”चौथ्याने लिहिलं – “हे खूपच भयानक आणि धोकादायक आहे.” एकंदरीत, हा अनोखा आणि रोमांचक डिनरचा व्हिडीओ लोकांना घाबरवतोही आणि हसवतोही.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.