(फोटो सौजन्य: X)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे नेहमीच अनेक नवनवीन आणि मनोरंजक व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी काय दिसून येईल याचा नेम नाही. लोक स्वतःला व्हायरल करण्यासाठी इथे अनेक नको नको ते प्रकार, स्टंट्स, जुगाड करू पाहतात पण प्रत्येक वेळेला त्यांचे हे पराक्रम यशस्वी होतातच असं नाही. अनेकदा स्वतःला व्हायरल करण्यासाठी केलेले हे प्रकार आपल्यावरच उलटतात आणि मग जे घडते ते भीषण असते. अशीच एक घटना सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्ये घडताना दिसून आली आहे, जिथे एका तरुणाने धरणावर स्टंट करण्याचा प्रयत्न केला असतो तो थेट पाण्याच्या प्रवाहात खाली कोसळला. हा स्टंट मुळात जीवघेणा होता आणि यात पुढे काय घडलं ते आपण आता सविस्तर जाणून घेणार आहोत.
काय घडलं व्हिडिओत?
राजस्थानमधील सवाई माधोपूर इथे ही घटना घडून आली आहे. येथील ढील धरणावर स्टंट करण्याचा प्रयत्न करताना एका तरुणाचा जीव धोक्यात आला. असे सांगितले जात आहे की यावेळी धरणातून पाणी वेगाने वाहत होते आणि तो तरुण तोल राखू शकला नाही. अचानक तो पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेला आणि ही घटना पाहून तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना तातडीने घटनास्थळी पोहोचले. मदत आणि बचाव पथकाने तातडीने शोध मोहीम सुरू केली. गोताखोरांना पाचारण करण्यात आले आणि आजूबाजूच्या परिसरात शोध सुरू आहे. तथापि, अद्याप तरुण सापडल्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
In a tragic incident from Sawai Madhopur, a young man was swept away while attempting a stunt on the Dheel Bandh. The mishap occurred amid strong water flow, highlighting the dangers posed during the ongoing monsoon season.
Local administration and rescue teams rushed to the… pic.twitter.com/cAvrwdRvDu
— StoryAaj (@Story_Aaj) September 3, 2025
दरम्यान पावसाच्या काळात अशा अनेक घटना कानावर पडत असतात. पावसाळ्यात अनेक ठिकाणी जाणे धोकादायक बनते अशात आपला जीव संकटात टाकून अशा ठिकाणी जाणे किंवा तिथे जाऊन स्टंट करणे नक्कीच आपल्या जीवावर बेतणारे ठरेल. आपला थोडा निष्काळजीपणा देखील आपल्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतो त्यामुळे अशा घटनांमधून धडा घ्यावा आणि असुरक्षित ठिकाणे चुकूनही जाऊ नये. ही घटना @Story_Aaj नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आली असून याचा व्हिडिओ आता वेगाने शेअर केला जात आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.