Couple Jump in Canal for making Reel video goes viral
Couple Jumped In Canal : सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, कधी भयावह अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे भूत लोकांमध्ये चढले आहे. यासाठी लोक धोकादायक स्टंट करत आहे. यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालायला देखील मागे-पुढे पाहत नाहीत. अनेकदा यामुळे लोकांचा जीव देखील धोक्यात आले आहे, अनेकांनी गंभीर दुखापतही झाली आहे. पण लोक सुधारण्याचे नाव काही घेत नाही.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका प्रेमी जोडप्याने असा काही स्टंट केला आहे की पाहून तुम्हीही हैराण व्हाल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एका कपलने मिठी मारुन कॅनलमध्ये उडी मारली आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, हे जोडपे कालव्याच्या कठावर उभे आहे. येथे आजूबाजूला इतर लोकही उभे आहे. याच वेळी जोडपे मिठी मारुन कालव्यामध्ये उडी घेतात. पाण्याचा जोरदार प्रवाहामध्ये ते उडी मारतात. हे केवळ त्यांनी रिलसाठी केल्याचे सांगितले जात आहे. पण हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा आहे याची माहिती मिळालेली नाही. पण हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओ
ना लाईफ की फिकर
ना पानी का डर..
बस Reels बननी चाहिए सर! 😒 pic.twitter.com/fsbkGXO29X— Natasha Yadav (@imnatasha09) August 8, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @imnatasha09 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी यावर संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर जोडप्याने ट्रोल केले जात आहे. एका युजरने, चित्रपटांनी लोकांचे डोकं खराब केलं आहे असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने असे म्हटले आहे की, हे दोघे वाचले कसे, नरकात जायला हवं यांनी. तिसऱ्या एकाने रिलची नशा दुसरं काही नाही असे म्हटले आहे. परंतु अनेकांनी असे धोकादायक स्टंट न करण्याचाही सल्ला दिलेला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.