(फोटो सौजन्य: X)
प्रत्येक प्राण्याची आपली अशी काही खासियत असते. कुत्रा हा प्राणी आपल्या प्रामाणिकतेसाठी ओळखला जातो. अनेकांना कुत्र्यांना घरात पाळायला फार आवडतं कारण एकवेळ माणूस विश्वासघात करेल आणि कुत्रा कधीही त्याच्या मालकाचा विश्वास ढासळू देत नाही. घराचे रक्षण करण्यासाठी खरंतर कुत्र्यांना आपल्या घरात पाळलं जात पण नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात श्वानाने त्याच्या घराचीच नाही तर परिसरातील चिमुकल्या मुलांच्याही रक्षणाचे काम हाती घेतल्याचे दृश्य दिसून आले. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक कुत्रा घराच्या गॅलरीत बसून घराची देखरेख करत असतो आणि तितक्यातच त्याला खालून काही चिमुकली मुले ओरडत पळत असताना दिसून येतात. चिमूल्यांना असं संकटात अडकल्याचं पाहून कुत्रा त्यांना वाचवण्याचा निर्णय करतो आणि लगेच बाल्कनीतून खाली रस्त्यावर उडी मारतो. खरंतर चिमुकल्यांच्या मागे गल्लीतील काही कुत्री मागे लागली होती ज्यामुळे त्या कुत्र्यांपासून चिमुकल्यांचे रक्षण करण्यासाठी हा श्वान त्याच्या मागे वेगाने पळत सुटतो. श्वानाचे हे कृत्य आता सोशल मीडियावर त्याला एका योद्धाची उपमा देण्यात येत आहे. कोणताही दुसरा विचार न करता फक्त लहान मुलांच्या रक्षणासाठी तो खाली उडी घेतो आणि त्याचे हे कृत्य त्याच्या ध्येयाचे प्रतीक ठरते. व्हिडिओ नक्की कुठला आहे ते अजून समजलं नसलं तरी त्याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.
In Rishikesh, A dog jumped like a superhero to save children from another dog.
pic.twitter.com/IwN1FUZgrN— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) August 9, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ठीक आहे मला कुत्रे खूप आवडतात पण इथे प्रामाणिकपणे सांगूया. कुत्र्याने मुलांना वाचवण्यासाठी नाही तर दुसऱ्या कुत्र्याला पळवून लावण्यासाठी उडी मारली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सुपर हिरोंना पोशाखाची गरज नसते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “सुपरडॉग”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.