
Crime in Progress Cartoon 2007
२००७ मध्ये प्रसिद्ध ब्राझिलियन राजकीय कार्टूनिस्ट कार्लोस लातूफ यांनी हे कार्टून तयार केले होते. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर आधारित हे व्यंगचित्र म्हणून त्यावेळी हे मानले होते. परंतु आता व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर या कार्टूनकडे एक भविष्यवाणी म्हणून पाहिले जात आहे. या कार्टूनमध्ये अंकल सॅम खिडकीच्या बाजूला तोंड करुन खुर्चीवर बसले आहेत. अंकल सॅम फोनवर संवाद साधत आहेत. तर मागच्या बाजूला टेबलवर फाइल्स आहे. ज्यावर, बोलिव्हीया, व्हेनेझुएला, क्यूबा, इराण देशांच्या नावाच्य फाइल्स एका बॉक्समध्ये दिसत आहे.
या बॉक्सवर TO DO असे लिहिलेले आहे. तर याखाली इराक, पॅलेस्टाईन, अफगाणिस्तान या देशांची नावे मानवी खोपडीवर लिहिलेली आहे, जी DONE नावाच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आली आहेत. हे कार्टून अमेरिकेविरोधी एक व्यंग मानले जाते. परंतु अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर याकडे भविष्यवाणी म्हणून पाहिले जात आहे. अमेरिकेने केवळ दीडा तासात कारवाई करत अध्यक्ष मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक केली आहे. यामुळे हे कार्टून सध्याच्या परिस्थितीशी मिळते जुळते असल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
Maduro Arrest : पाच दिवस आधीच इशारा? मादुरो अटकेनंतर पेरुच्या तांत्रिकांची भविष्यवाणी चर्चेत
व्हायरल पोस्ट
Cartoon prediction, 2007.#Venezuela pic.twitter.com/hPTRi3J9cF — Carlos Latuff (@LatuffCartoons) January 3, 2026
हे कार्टून सोशल मीडियावर जोरदा चर्चेत असून पुढचा नंबर इराण, क्यूबा आणि बोलिव्हियाचा असाणार का? या देशांवर अमेरिका काय कारवाई करेल, कि हा केवळ एक योगायोग आहे अशा चर्चा सर्वणजण करत आहे. शिवाय नुकतेच पेरु येथील लिमा समुद्रकिनारी काही तात्रिंका गटांनी देखील मादुरोच्या परिस्थितीवर भविष्यवाणी केली होती. ही भविष्यवाणी खरी ठरली असून सध्या यो दोन्ही घटना आणि भविष्यवाण्यांनी जगभरात खळबळ माजली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.