(फोटो सौजन्य – X)
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एक किंग कोब्रा झाडावर बसल्याचे दिसतात. तो घाबरलेला असतो कारण झाडाच्या खाली श्वानांची टोळी त्याची शिकार करण्यासाठी सज्ज झालेली असतात. झाडाच्या खाली एकूण तीन श्वान मिळून कोब्रावर भुंकत असतात. अशात पुढच्याच क्षणी त्यातील एक श्वान कोब्राला पकडून खेचतच खाली पाडतो. कोब्राला खाली पाडताच इतर दोन श्वानही खुश होतात आणि कोब्राला चावून ते तिघही त्याला फस्त करु लागतात. तिघांच्या एकजुटीमुळे कोब्राचे काही त्यांच्यासमोर चालत नाही आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो. दरम्यान यूजर्सने मात्र व्हिडिओच्या सत्यतेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. काहींचा असा विश्वास आहे की, हा व्हिडिओ खरा नसून तो एआयद्वारे तयार करण्यात आला आहे.
😱😱 pic.twitter.com/x2OOWeLzbD — Nature🍀🌸 (@NatureNexus4321) January 2, 2026
दरम्यान @NatureNexus4321 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा एआय व्हिडिओ आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला शंका आहे की ते सर्व कुत्रे अजूनही जिवंत आहेत, जो कोणी विषारी कोब्राला चावला असेल तो मेलेला असेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “कुत्रे हे फक्त एआय असल्यावरच करू शकतात…”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






